MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:58 IST2025-05-29T13:57:37+5:302025-05-29T13:58:02+5:30

'हेरा फेरी' मध्ये त्याला घेतलं तर मी... हरभजन सिंग गंमतीत काय म्हणाला?

harbhajan singh says suryakumar yadav can play baburao s role in hera pheri he is great actor | MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी

MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी

बीटाऊनमध्ये सध्या 'हेरा फेरी ३'ची चर्चा आहे. परेश रावल (Paresh Rawal) यांनी सिनेमा सोडल्याने वाद सुरु झाला आहे. अचानक सिनेमातून एक्झिट घेतल्यानंतर अक्षय कुमारने त्यांच्यावर नुकसानभरपाईची केसही केली. सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. परेश रावल यांनी सिनेमात साकारलेली बाबूराव आपटे ही भूमिका खूप गाजलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याची कल्पना कोणी करु शकत नाही. नुकतंच माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) परेश रावल यांची भूमिका एक क्रिकेटपटू नक्की करु शकेल अशी मजेशीर टिप्पणी केली आहे.

क्रिकेटपटूंमध्येही कोण टॅलेंटेड अभिनेते आहेत? असा प्रश्न हरभजनला विचारण्यात आला. 'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, " माझ्याहून बरेच हरहुन्नरी कलाकार आहेत.  विराट कोहली मस्त गाणं म्हणोतो, अभिनयही करतो. युवराज सिंग तर आहेच. सूर्यकुमार यादव सुद्धा (Suryakumar Yadav) अभिनेता म्हणून एकदम शोभून दिसेल. तो खूप मजेशीर आहे. 'हेरा फेरी'टाईप अभिनेता आहे. आता मी काही बोललो तर कॉन्ट्रोव्हर्सीच होईल. कारण नुकतंच परेश रावल यांनी सिनेमा सोडला हे मी वाचलं. अक्षय भाई माझ्यावर केस करु नका(हसतच). कारण त्यांचा काहीतरी वाद सुरु आहे मी वाचलं आहे. पण सूर्या नक्कीच नेक्स्ट स्टार इन लाईन आहे. परेश सरांसारखा अभिनय करेल असं मी म्हणत नाही पण त्याला त्यांचे सगळे डायलॉग लक्षात आहेत. तो नक्कीच बाबूभैय्यासाठी परेशजींची जागा घेऊ शकतो. त्याला जर ही भूमिका मिळाली तर १५ टक्के कमिशन मी घेईन."

हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा यांचा युट्यूबवर नवा शो लवकरच येत आहे. Who is the boss असं शोचं नाव आहे. हा चॅट शो असणार आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या पत्नीसह सहभागी होणार आहेत. एकदम धमाल, मजेशीर किस्से यातून ऐकायला मिळणार आहेत. क्रिकेटपटूंना सगळेच ओळखतात पण त्यांच्या पत्नींबद्दल कोणाला माहित नसतं. या महिलांची आपली एख ओळख आहे, प्रत्येकाची वेगळी गोष्ट आहे. तीच गोष्ट या शोमधून उलगडेल अशा शब्दात हरभजनने शोबद्दल सांगितलं.

Web Title: harbhajan singh says suryakumar yadav can play baburao s role in hera pheri he is great actor