Kangana Ranaut : "कंगनासोबत काम करणं माझी खूप मोठी चूक...", या प्रसिद्ध दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 03:17 PM2022-07-06T15:17:08+5:302022-07-06T15:20:42+5:30

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा कंगनाची चर्चा होतेय. पण एका वेगळ्याच कारणासाठी....

Hansal Mehta Opens Up About Working With Kangana Ranaut, Calls It a Massive Mistake | Kangana Ranaut : "कंगनासोबत काम करणं माझी खूप मोठी चूक...", या प्रसिद्ध दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप

Kangana Ranaut : "कंगनासोबत काम करणं माझी खूप मोठी चूक...", या प्रसिद्ध दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप

googlenewsNext

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. चार नॅशनल अवार्ड जिंकणारी कंगना प्रत्येक सामाजिक व राजकीय मुद्यावर बोलते. अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेते. आता पुन्हा एकदा कंगनाची चर्चा होतेय. पण एका वेगळ्याच कारणासाठी. होय, 2017 साली कंगनाचा ‘सिमरन’ हा सिनेमा रिलीज झाला होता आणि तो दणकून आपटला होता. याच चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता  (Hansal Mehta) हे कंगनाबद्दल असं काही बोलून गेलेत की ऐकून सगळेच थक्क झालेत.
Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत हंसल मेहता यांनी कंगनावर निशाणा साधला.

काय म्हणाले हंसल मेहता?
कंगनाने ‘सिमरन’ हा सिनेमा एडिट केला होता का? असा प्रश्न मुलाखतीत हंसल मेहता यांना विचारण्यात आला. यावर एडिट नाही तिने पूर्णपणे टेकओव्हर केलं होतं, असं हंसल मेहता म्हणाले. खरं तर एडिटींग करण्यासारखं तिच्याकडे काहीही काम नव्हतं. कारण ‘सिमरन’साठी तिला जे हवं होतं तेच तिने शूट करून घेतलं. आपल्याला जे वाटतं, आपण जसं आहोत, तेच प्रत्येक भूमिकेत उतरलं पाहिजे, असा अट्टाहास नसावा. पण तिने प्रत्येकवेळी हाच पर्याय निवडला. कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यावर टीका करण्याची ही वेळ नाही. पण तिच्यासोबत काम करणं ही माझी खूप मोठी चूक होती, असं हंसल मेहता म्हणाले. 

‘सिमरन’ हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला होता. हंसल मेहता यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट फ्लॉप होण्याचं सगळ्यात मोठं कारण कंगना असल्याचं मानलं गेलं होतं. म्हणायला हंसल मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. पण कंगना स्वत:च या चित्रपटाची दिग्दर्शक बनली होती आणि हंसल मेहता यामुळे नाराज होते. इतक्या वर्षानंतर त्यांनी ही नाराजी अखेर बोलून दाखवलीच.

Web Title: Hansal Mehta Opens Up About Working With Kangana Ranaut, Calls It a Massive Mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.