DON'T MISS: ​सुहाना खानचा ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ तुम्ही पाहिलातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2017 10:14 AM2017-02-09T10:14:39+5:302017-02-09T16:23:05+5:30

सुहाना खान! हे नाव आज कुणाला ठाऊक नाही. बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याची मुलगी आणि बॉलिवूडची रायझिंग स्टार असेच सुहाना खानबद्दल म्हणायला हवे. सध्या सुहानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून शाहरूखची लेक मोठे नाव कमावणार, हे तुम्हाला पटल्यावाचून राहणार नाही.

DO NOT MISS: Have you seen Suhana Khan's live performance? | DON'T MISS: ​सुहाना खानचा ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ तुम्ही पाहिलातं?

DON'T MISS: ​सुहाना खानचा ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ तुम्ही पाहिलातं?

googlenewsNext
हाना खान! हे नाव आज कुणाला ठाऊक नाही. बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याची मुलगी आणि बॉलिवूडची रायझिंग स्टार असेच सुहाना खानबद्दल म्हणायला हवे. शाहरूखची हीच लाडकी लेक सध्या चर्चेत आलीय. आता सुहाना चर्चेत आलीय, म्हणजे तिचा पार्टीतला कुठलासा फोटो व्हायरल झाला, असे तुम्हा समजाल. मात्र असे अजिबात नाही. सध्या सुहानाचा कुठलासा फोटो नाही तर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून शाहरूखची लेक मोठे नाव कमावणार, हे तुम्हाला पटल्यावाचून राहणार नाही. सुहानाचा हा व्हिडिओ तिच्या शाळेतील ‘परफॉर्मन्स डे’चा आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना सिन्ड्रेला बनलेली आहे आणि स्वत:ची कहानी ऐकवतेय. यात सुहाना  सुंदरशा फॉकमध्ये आहे. शिवाय खांद्यावर तिने एक स्कार्फ घेतलेला आहे. या व्हिडिओत पाहण्यासारखे काय असेल तर, ते म्हणजे सुहानाचा अभिनय. संवाद फेकताना सुहानाच्या आवाजातील चढ-ऊतार, संवाद फेकण्याची तिची पद्धत, शब्दागणिक बदलणारे तिच्या चेहºयावरचे हावभाव, तिची देहबोली हे सगळे काही, तिच्या लपलेल्या एका प्रगल्भ अभिनेत्रीची चुणूक दाखवणा-या आहेत.

{{{{twitter_video_id####}}}}



{{{{twitter_video_id####}}}}


मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी एक म्हण आहे. सुहानाला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. सुहानाचा हा व्हिडिओ पाहताना या म्हणीची तुम्हाला खात्री पटेल. खरे तर सुहानाने बॉलिवूडमध्ये यावे, अशी किंगखानची मनापासून इच्छा आहे. सुहाना अभिनेत्री बनली तर मला प्रचंड आनंद होईल, असे शाहरूख एका मुलाखतीत म्हणाला होता. बरेच आई-वडिल आपली मुलगी फिल्म इंडस्ट्रीत सुरक्षित राहिल की नाही, या विचाराने चिंतीत दिसतात. पण मला विचाराल तर माझी मुलगी या इंडस्ट्रीत आली तर मला मनापासून आनंद होईल. ही इंडस्ट्री अतिशय चांगली आहे. कष्ट घेण्याची तयारी असेल तर तुमच्या कष्टाची किंमत करणारे अनेक लोक या इंडस्ट्रीत भेटतील, असे शाहरूख म्हणाला होता.  

 ALSO READ :पाहा शाहरुखच्या मुलीचे हे फोटो होत आहेत व्हायरल
​किंगखानचा आर्यन, सुहानाबद्दल खुलासा

Web Title: DO NOT MISS: Have you seen Suhana Khan's live performance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.