'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:30 IST2026-04-22T10:24:30+5:302026-04-22T10:30:57+5:30

आदित्य धर यांचा चित्रपट 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जगभरात आपला ठसा उमटवल्यानंतर आदित्य धर हा या चित्रपटाबद्दल एक खास गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे.

director Aditya Dhar is coming up with a new movie related bts of dhurandhar | 'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती

'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जगभरात आपला ठसा उमटवल्यानंतर आदित्य धर या चित्रपटाबद्दल एक खास गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर'चा 'मेकिंग व्हिडिओ' आता सिनेमागृहात प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे आदित्य धरच्या 'धुरंधर'ची पडद्यामागची गोष्ट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल.

सिनेमागृहात दिसणार 'मेकिंग ऑफ धुरंधर'

 'धुरंधर' आणि 'धुरंधर २' च्या अभूतपूर्व यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या मेकिंगची प्रक्रिया प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटातील सर्व 'बिहाइंड द सीन्स' (BTS) फुटेज आणि कलाकारांच्या मुलाखती एकत्रित करून एक वेगळा पूर्ण चित्रपट तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी २०२४ मध्ये 'झिरो से रीस्टार्ट' हा मेकिंगवर आधारित चित्रपट आला होता, मात्र त्याला इतका प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र 'धुरंधर'बद्दलची क्रेझ पाहता निर्माते हा धाडसी प्रयोग करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'धुरंधर'चा हा BTS व्हिडीओ मेंकिगपट २०२६ च्या शेवटी सिनेमागृहात प्रदर्शित केला जाऊ शकतो. त्यानंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहण्यास उपलब्ध होईल. दिग्दर्शक आदित्य धर यांनी आतापर्यंत चित्रपटाच्या मेकिंगचे कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर लीक होऊ दिले नाहीत, त्यामुळे पडद्यामागे हे 'धुरंधर' सीन्स कसे शूट झाले, हे सर्व पाहणं प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज असतील.

कोणताही बॉलिवूड चित्रपट जेव्हा रिलीज होतो त्याआधी कलाकार मीडियाला मुलाखती देताना दिसतात, पण 'धुरंधर'च्या बाबतीत रणवीर सिंग, अर्जुन रामपाल किंवा सिनेमातील कोणत्याही मुख्य कलाकाराने अद्याप मोठी मुलाखत दिलेली नाही. त्यामुळे प्रमुख कलाकारांच्या पहिल्या अधिकृत मुलाखती थेट या 'मेकिंग' चित्रपटाचा भाग असतील.

 १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर २' या चित्रपटाने जगभरात तब्बल १,७५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने १,११७ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, सारा अर्जुन, राकेश बेदी, संजय दत्त, आर. माधवन आणि दानिश पंडोर यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. 'धुरंधर'च्या पडद्यामागच्या या BTS प्रवासाला पाहण्यासाठी चाहते आता प्रचंड उत्सुक आहेत.

Web Title : 'धुरंधर' की मेकिंग फिल्म आ रही है! आदित्य धर ने खोले पर्दे के पीछे के राज।

Web Summary : आदित्य धर की 'धुरंधर' की मेकिंग फिल्म 2026 में रिलीज होने के लिए तैयार है, जिसमें पर्दे के पीछे के फुटेज और रणवीर सिंह जैसे सितारों के साथ विशेष साक्षात्कार दिखाए जाएंगे। 'धुरंधर 2' की सफलता के बाद, जिसने दुनिया भर में ₹1,758 करोड़ की कमाई की, प्रशंसक इस अनूठे सिनेमाई अनुभव का बेसब्री से इंतजार कर रहे हैं।

Web Title : 'Dhurandhar' making-of movie coming! Aditya Dhar reveals behind-the-scenes secrets.

Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar' making-of movie is set to release in 2026, showcasing behind-the-scenes footage and exclusive interviews with stars like Ranveer Singh. Following the success of 'Dhurandhar 2,' which grossed ₹1,758 crore worldwide, fans eagerly anticipate this unique cinematic experience.