शाहरूख खानची मुलगी सुहानाचा ‘सिंड्रेला’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 16:31 IST2017-02-09T10:41:38+5:302017-02-09T16:31:55+5:30

काही दिवसांपूर्वीच त्याचा मुलगा अबराम त्याच्या क्युट लूक्स अन् नटखटपणामुळे चर्चेत आला होता, तर आता शाहरूखची मुलगी सुहाना खान चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, सुहानाने एका नाटकात साकारलेल्या ‘सिंड्रेला’ नावाच्या भूमिकेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून, तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Did you watch the movie 'Cinderella' from Shah Rukh Khan's daughter? | शाहरूख खानची मुलगी सुहानाचा ‘सिंड्रेला’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

शाहरूख खानची मुलगी सुहानाचा ‘सिंड्रेला’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

िनेता शाहरूख खान नेहमीच या ना त्या कारणाने प्रसिद्धीझोतात असतो; मात्र प्रसिद्धीत राहण्याच्या त्याच्या या टेक्निकला आता त्याची मुलेच जबरदस्त टक्कर देताना बघावयास मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याचा मुलगा अबराम त्याच्या क्युट लूक्स अन् नटखटपणामुळे चर्चेत आला होता, तर आता शाहरूखची मुलगी सुहाना खान चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, सुहानाने एका नाटकात साकारलेल्या ‘सिंड्रेला’ नावाच्या भूमिकेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून, तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

इंग्लिशच्या या प्लेमध्ये सुहानाच्या अ‍ॅक्टिंगपासून ते तिचा आवाज आणि स्टाइल बघण्यासारखी आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, सुहानाने अ‍ॅक्टिंग करणे शाहरूखला फारसे आवडणार नाही. मात्र सुहानाचा हा व्हिडीओ बघून असे वाटतेय की, शाहरूख सुहानाला अ‍ॅक्टिंगपासून फार काळ दूर ठेवू शकणार नाही. कारण सुहाना या नाटकात एका परिपक्व कलाकाराप्रमाणे अभिनय करताना बघावयास मिळत आहे. 



सिंड्रेलाच्या या भूमिकेत सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. जेव्हा स्टेजच्या दुसºया बाजूने उभा असलेला एक मुलगा तिच्याकडे बघून म्हणतोय की, ही सिंड्रेला आहे आणि तिच्या वाईट आईला दोन मुली आहेत. दोघीही सारख्याच सुंदर आहेत. मध्येच त्याला थांबवित सिंड्रेला म्हणतेय, तुझा गैरसमज झाला आहे. मी सर्वांत सुंदर आहे. मध्येच स्टेजच्या दुसºया बाजूने उभी असलेली एक मुलगी या वादात उडी घेत म्हणतेय की, तुम्ही दोघीही सुंदर आहेत. यावर नाराज झालेली सिंड्रेला म्हणतेय की, मला माझी कथा माहीत आहे, धन्यवाद!

खरं तर सुहानाला अभिनय प्रचंड आवडतो. ती थिएटरही करीत आहे. मात्र शाहरूखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, जर सुहाना माझ्यापेक्षा पाच पटीने काम करण्याची तयारी ठेवत असेल अन् त्यानंतरही दहा पटीने कमी मानधन घेण्यास तयार असेल तर ती अभिनेत्री बनू शकते. मला असे वाटतेय की तिने अभिनेत्रींना होताना प्रत्येक संकटाचा सामना करायला हवा. माझ्या सहयोगी अभिनेत्री ज्या पद्धतीने स्ट्रगल करून स्वत:ला सिद्ध करतात अगदी त्याच पद्धतीने तिनेही त्या सर्व अडचणींवर मात करणे अपेक्षित आहे. यासाठी जर तिची तयारी असेल तरच तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा विचार करावा, असे शाहरूखने म्हटले होते. मात्र सुहानाचे हे नाटक पाहता ती अभिनय क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यास तयार असून, पुढची वाटचाल ती याच ट्रॅकवर करू शकते.

Web Title: Did you watch the movie 'Cinderella' from Shah Rukh Khan's daughter?