Bhoot Movie : भूताची भीती वाटत असेल तर नक्कीच पाहू नका भूतः द हाँटेड शिपचा ट्रेलर, आहे अतिशय भीतीदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:48 IST2020-02-03T17:47:44+5:302020-02-03T17:48:52+5:30

Bhoot Movie : भूतः द हाँटेड शिपचा ट्रेलर पाहाताना आपल्या अंगावर काटा येतो यात काहीच शंका नाही.

Did you see vicky kaushal's 'Bhoot Part One: The Haunted Ship' trailer? | Bhoot Movie : भूताची भीती वाटत असेल तर नक्कीच पाहू नका भूतः द हाँटेड शिपचा ट्रेलर, आहे अतिशय भीतीदायक

Bhoot Movie : भूताची भीती वाटत असेल तर नक्कीच पाहू नका भूतः द हाँटेड शिपचा ट्रेलर, आहे अतिशय भीतीदायक

ठळक मुद्देभूतः द हाँटेड शिपच्या ट्रेलरमध्ये एक जहाज आणि त्यावर घडत असलेल्या विचित्र घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ट्रेलर थरकाप उडवणारा आहे.

विकी कौशलच्या भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या चित्रपटात विकी कौशलच्या चाहत्यांना त्याचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ते या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत होते. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर याच ट्रेलरची चर्चा आहे.

भूतः द हाँटेड शिपच्या ट्रेलरमध्ये एक जहाज आणि त्यावर घडत असलेल्या विचित्र घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ट्रेलर थरकाप उडवणारा असून या ट्रेलरमध्ये आपल्याला विकी कौशल, आशुतोष राणा यांना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 

भूतः द हाँटेड शिप या ट्रेलरमध्ये आपल्याला एक भलेमोठे जहाज दिसत असून हे जहाज अचानक समुद्रकिनारी मिळाले आहे. या जहाजात काय आहे हे पाहाण्यासाठी एक ऑफिसवर (विकी कौशल) त्याच्या आत जातो. पण त्याच्या आजूबाजूला अनेक सावल्या, भूतं आपल्याला फिरताना दिसतात. या ट्रेलरमध्ये एक बाई आणि मुलगी दिसत असून हे कोण आहेत असा प्रश्न नक्कीच पडतो. हा ट्रेलर पाहाताना आपल्या अंगावर काटा येतो यात काहीच शंका नाही.

भूतः द हाँटेड शिप या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केले असून धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भूत हा धर्मा प्रोडक्शन आणि विकी कौशलचा पहिला हॉरर चित्रपट असून हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.


 

Web Title: Did you see vicky kaushal's 'Bhoot Part One: The Haunted Ship' trailer?