२० व्या वर्षी दिला पहिला हिट सिनेमा! आता सारा अर्जुनची 'या' अभिनेत्यासोबत जमली जोडी, नावाजलेल्या नायिकेला केलं रिप्लेस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:51 IST2026-04-15T10:50:27+5:302026-04-15T10:51:39+5:30
'धुरंधर' नंतर सारा अर्जुनचं नशीब चमकलं! 'या' सुपरस्टारसोबत जमली जोडी, कोण आहे तो?

२० व्या वर्षी दिला पहिला हिट सिनेमा! आता सारा अर्जुनची 'या' अभिनेत्यासोबत जमली जोडी, नावाजलेल्या नायिकेला केलं रिप्लेस?
Bollywood Actress Sara Arjun: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर ’ या चित्रपटात यालिनाची भूमिका साकारून अभिनेत्री सारा अर्जुननं प्रेक्षकांकडून वाहवाह मिळवली.या चित्रपटातील आपल्या सहज सुंदर अभिनयाने सगळ्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. धुरंधर च्या यशानंतर अभिनेत्री सारा अर्जुन सध्या प्रचंड चर्चेत आहे.विशेष म्हणजे, कमी वयातच तिने हे यश मिळवलं आहे. या चित्रपटानंतर आता सारासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले आहेत.अलिकडेच एक बातमी समोर आली होती की, सारा अर्जुन लवकरच अभिनेत्री मधुबाला यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ही बातमी ताजी असतानाच आता तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
दरम्यान, नुकतीच सारा अर्जुनच्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल मोठी अपडेट हाती लागली आहे. साउथ स्टार, अभिनेता धनुष हा 'D56' या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट यावर्षी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धनुषच्या या चित्रपटात सारा अर्जुन त्याच्या नायिकेची भूमिका साकारणार आहे, असं बोललं जात आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' फेम अभिनेत्री सारा अर्जुनला धनुषच्या नायिकेच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. असं घडल्यास सारा अर्जुनच्या कारकिर्दीसाठी हा एक मोठा प्रोजेक्ट ठरू शकेल. दरम्यान, 'धुरंधर'च्या यशानंतर ती सतत चर्चेत आहे. पण चित्रपटाबद्दलची ही अपडेट समोर येताच साराचे चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान, याबाबत निर्माते किंवा सारा अर्जुनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
'या' अभिनेत्रीला केला रिप्लेस
मिळालेल्या माहितीनुसार, या भूमिकेसाठी 'कांतारा चॅप्टर १' मधील अभिनेत्री रुक्मिणी वसंतची निवड करण्यात आली असल्याचं वृत्त होतं. मात्र, आता रुक्मिणी या चित्रपटाचा भाग नसल्याचं कळतंय. सध्या रुक्मिणी वसंत वेगवेगळ्या प्रोजेक़्टसमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिच्या तारखा जुळत नसल्यामुळे अभिनेत्रीला या प्रोजेक्टमधून बाहेर पडावं लागलं.तिने आधीच इतर प्रोजेक्टसाठी आधीच बऱ्याच तारखा दिल्या आहेत आणि त्यामुळे ती इतर चित्रपटांसाठी वेळ देऊ शकत नाही, असं सांगितलं जातंय.