ब्रेकच्या चर्चांना पूर्णविराम! दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर दीपिकाचा 'किंग'च्या सेटवर ॲक्शन मोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 09:57 IST2026-04-25T09:57:00+5:302026-04-25T09:57:54+5:30
आपल्या प्रोफेशनल कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी दीपिकाने प्रेग्नन्सीमध्येही मेहनत घेत आहे.

ब्रेकच्या चर्चांना पूर्णविराम! दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर दीपिकाचा 'किंग'च्या सेटवर ॲक्शन मोड
बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पादुकोण खूप प्रोफेशनल आहे. अलीकडेच दीपिकाने तिची दुसरी प्रेग्नन्सी जाहीर केली असून, यामुळे ती कामातून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दीपिकाने शाहरुख खानच्या आगामी 'किंग' चित्रपटासाठी एका हाय-व्होल्टेज ॲक्शन सीनचे शूटिंग पूर्ण केले आहे. आपल्या प्रोफेशनल कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी दीपिकाने प्रेग्नन्सीमध्येही घेतलेली ही मेहनत सध्या सिनेसृष्टीत कौतुकाचा विषय ठरत आहे.
हाय-व्होल्टेज ॲक्शन अन् दीपिकाचा जलवा
मीडिया रिपोर्टनुसार, २१ आणि २२ एप्रिल रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील 'गोल्डन टोबॅको स्टुडिओ'मध्ये या विशेष सीनचे चित्रीकरण पार पडले. या हाय-ऑक्टेन कॉम्बॅट सीनमध्ये दीपिका पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये सेटवर आली. शाहरुख खान आणि दीपिकाने या दोन दिवसांत हाय ऑक्टेन फाईट सीक्वेन्स शूट केला असून, यासाठी स्टुडिओमध्ये मोठा सेट उभारण्यात आला होता. चित्रपटाची भव्यता लक्षात घेता या ॲक्शन दृश्याची कोरिओग्राफी अत्यंत भव्य स्तरावर करण्यात आली आहे.
ब्रेकच्या चर्चांना दिले सडेतोड उत्तर
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी १९ एप्रिल २०२६ रोजी सोशल मीडियाद्वारे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. या घोषणेनंतर चाहत्यांना वाटले होते की, दीपिका काही काळ विश्रांती घेईल. परंतु, अवघ्या दोन दिवसांतच शूटिंग सेटवर परतत आणि कठीण ॲक्शन सीन्स शूट करत दीपिकाने सर्वांनाच थक्क केले आहे.
दीपिकाचे आगामी बिग बजेट प्रोजेक्ट्स
शाहरुख खानच्या 'किंग' व्यतिरिक्त दीपिका पादुकोण दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत 'राका' या बहुप्रतिक्षित चित्रपटातही झळकणार आहे. सध्या दीपिकाच्या हातात अनेक मोठे प्रोजेक्ट्स असून, ती एकापाठोपाठ एक त्यांचे शूटिंग पूर्ण करण्यावर भर देत आहे. प्रेग्नन्सीच्या काळातही कामाचा उत्साह कायम ठेवत दीपिकाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ती खऱ्या अर्थाने बॉलिवूडची 'क्वीन' आहे. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'किंग' चित्रपटात दीपिकाचा हा निडर अंदाज पाहण्यासाठी चाहते आता कमालीचे उत्सुक आहेत. लेकीच्या जन्मानंतर दीपिकाने ८ तासांच्या शिफ्टची अट ठेवली होती. आता दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतरही दीपिका अटीवर कायम राहणार का हेही पाहणं महत्वाचं आहे.