श्रद्धा होणार ‘दाऊद’ची बहीण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:03 IST2016-04-30T18:23:51+5:302016-05-01T00:03:55+5:30

शीर्षक वाचून दचकला ना? अहो श्रद्धा कपूर रुपेरी पडद्यावर दाऊद इब्राहिमच्या बहीणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. ‘शुट आऊट ...

Dawood's sister to believe! | श्रद्धा होणार ‘दाऊद’ची बहीण!

श्रद्धा होणार ‘दाऊद’ची बहीण!

र्षक वाचून दचकला ना? अहो श्रद्धा कपूर रुपेरी पडद्यावर दाऊद इब्राहिमच्या बहीणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. ‘शुट आऊट अ‍ॅट लोखंडवाला’ फेम दिग्दर्शक अपूर्व लाखिया अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पार्करच्या आयुष्यावर ‘हसीना’ नावाचा चित्रपट बनवत आहे. 

सुरुवातीला ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हसीनाची भूमिका करणार होती. तिला कथानकही खूप आवडले. अशी भूमिका करण्यासाठी मी खूप उत्साहित असल्याचेही तिने बोलले होते. परंतु काही कारणास्तव तिला हा चित्रपट सोडावा लागला आणि तिच्या जागी अपूर्वने श्रद्धा कपूरला कास्ट केले.

चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ ‘हसीना’मध्ये दाऊदचा रोल करणार आहे. रिअल लाईफ बहीण-भाऊ आता रील लाईफमध्ये अंडरवर्ल्डच्या भावंडाचे काम करणार म्हटल्यावर उत्सुकता आणखी वाढली आहे. श्रद्धा सध्या ‘बागी’ चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Dawood's sister to believe!