...तर 'बॉडीगार्ड' सिनेमात दिसली असती डेझी शाह! का नाकारली ऑफर? खुलासा करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:23 IST2026-05-19T15:21:05+5:302026-05-19T15:23:37+5:30
डेझी शाहला 'जय हो' आधी सलमानच्या 'या' सुपरहिट सिनेमाची मिळालेली ऑफर, मग का नाकारली? स्वत: च सांगितलं कारण

...तर 'बॉडीगार्ड' सिनेमात दिसली असती डेझी शाह! का नाकारली ऑफर? खुलासा करत म्हणाली...
Daisy Shah: अभिनेत्री डेझी शाह हा मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. डेझी शाह बराच काळ इंडस्ट्रीत सक्रिय आहे. बॉलिवूसह तिने काही कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.मात्र, सलमान खानच्या जय हो या चित्रपटात काम करून ती रातोरात स्टार झाली. परंतु. तुम्हाला माहितीये का जय हो चित्रपटाआधी तिला सलमानच्या बॉडीगार्ड या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली होती. पण, तिने ही ऑफर नाकारली. एका मुलाखतीमध्ये स्वत डेझीने याबद्दल खुलासा केला आहे. शिवाय चित्रपट नाकारण्यामागचं कारणही सांगितलंय.
अलिकडेच बॉलिवूड बबल सोबत संवाद साधताना डेझी शाह म्हणाली, मला त्यांच्यासमोर जे काही बोलायचं होतं ते बोलण्यासाठी मला माझं सगळं धैर्य एकवटावं लागलं. जेव्हा मी चित्रपटाची ऑफर नाकारली, तेव्हा खोलीत जवळपास पाच ते सात मिनिटं शांतता होती. मी मनातल्या मनात विचार करत होते, सलमान सरांनी काहीतरी बोलावं... अखेर ते फक्त एवढंच बोलले की, ठीक आहे.
सलमानचं कौतुक करत म्हणाली...
मग डेझी सलमानचं कौतुक करत म्हणाली, "इंडस्ट्रीतील सर्वात जास्त काळजी घेणार्या लोकांपैकी ते एक आहेत. मग चित्रपटाचा सेट असो किंवा वैयक्तिक आयुष्यात ते प्रत्येकाची तितकीच काळजी घेतात."
या कारणामुळे नाकारली ऑफर...
दरम्यान, चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पूर्णवेळ काम करण्यापूर्वी, डेझी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची असिस्टंट म्हणून काम करत असे. यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. याचनंतर सलमान खानने तिला 'बॉडीगार्ड'साठी विचारले होते. मात्र, डेझी शाहने त्याला नकार दिला.डेझी शाहने खुलासा केला आहे की, 'बॉडीगार्ड' चित्रपटातील आपली भूमिका खूपच लहान आहे असं वाटल्यामुळे तिने या चित्रपटासाठी नकार दिला होता.
डेझीने नकार दिल्यानंतर, ती भूमिका हेझल कीचने साकारली. सुमारे दीड वर्षानंतर, सलमानने पुन्हा डेझीशी संपर्क साधला आणि तिला 'जय हो'साठी ऑडिशन देण्यास सांगितलं.