बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:31 IST2025-06-21T10:30:36+5:302025-06-21T10:31:47+5:30

संजय कपूर यांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न, भारतीय हॉकी संघाच्या माजी खेळाडूने शेअर केला Video

businessman sunjay kapur was given cpr on polo field last rescue video viral from london | बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर

बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर

बिझनेसमन संजय कपूर (Sunjay Kapur) यांचं १२ जून रोजी निधन झालं. अभिनेत्री करिश्मा कपूरचे ते पूर्व पती होते. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लंडनमध्ये पोलो खेळत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान त्यांना मैदानावरच तातडीने CPR ही देण्यात आला होता. मात्र तरी उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता CPR देतानाचा त्यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे.

संजय कपूर यांना पोलो खेळाची आवड होती. लंडनच्या एका क्लबमध्ये ते पोलो खेळायचे. तसंच त्यांचे इतर संघांसोबत सामनेही व्हायचे. १२ जून रोजी पोलोचाच सामना सुरु होता. नेहमीप्रमाणे संजय कपूर जोशात होते. मात्र अचानक ते कोसळले. तोंडात मधमाशी गेली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला अशी माहिती समोर आली. 'तोंडात काहीतरी गेलं आहे' हे त्यांचे शेवटचे शब्द होते. असं म्हणताच ते जमिनीवर कोसळले. यानंतर तात्काळ वैद्यकीय मदतकक्ष तिथे हजर झाला. त्यांना मैदानावरच सीपीआर देत वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. सीपीआर देतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू अजित नंदाल यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. 

"संजय कपूर यांना वाचवण्याचा प्रयत्न करतानाचा शेवटचा व्हिडिओ...सज्जन जैसाल आणि संजय यांच्या संघात सामना सुरु होता. हॉर्स लव्हर्ससाठी हा दु:खद क्षण आहे. मित्रा तुझ्या आत्म्याला शांती मिळो." असं त्यांनी व्हिडिओसोबत लिहिलं आहे. 

संजय कपूर यांचं १२ जून रोजी निधन झालं. तर १९ जून रोजी त्यांचं पार्थिव दिल्लीत आणण्यात आलं. काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्यांची पत्नी प्रिया सचदेव आणि मुलंही होती. तसंच पूर्व पत्नी करिश्मा कपूर, तिची दोन्ही मुलं, करीना कपूर, सैफ अली खान हेही पोहोचले होते. सर्वांनी साश्रूनयनांनी संजय कपूर यांना निरोप दिला.

Web Title: businessman sunjay kapur was given cpr on polo field last rescue video viral from london