'बॉर्डर २' नंतर दिलजीत दोसांझचं नशीब उजळलं! 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसह झळकणार, कधी रिलीज होणार सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:03 IST2026-01-29T18:00:06+5:302026-01-29T18:03:03+5:30

'बॉर्डर २' नंतर दिलजीत दोसांझला लागली लॉटरी! 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम

bollywood director imtiaz ali making film with diljit dosanjh and sharvari wagh know about release date | 'बॉर्डर २' नंतर दिलजीत दोसांझचं नशीब उजळलं! 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसह झळकणार, कधी रिलीज होणार सिनेमा?

'बॉर्डर २' नंतर दिलजीत दोसांझचं नशीब उजळलं! 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसह झळकणार, कधी रिलीज होणार सिनेमा?

Diljit Dosanjh: 'बॉर्डर-२' सिनेमाची सगळीकडे चर्चा होताना दिसते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरला आहे. तर अवघ्या ६ दिवसांत चित्रपटाने२०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, या चित्रपटात अभिनेता दिलीजीत दोसांझने वायुदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.  अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटात तो सनी देओल, वरुण धवन आणि अहान शेट्टीसोबत दिसत आहे. एकीकडे  'बॉर्डर-२' सिनेमाचं यश अनुभवत असतानाचा दिलजीत दोसांझचं नशीब फळफळलं आहे. लवकरच तो एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दरम्यान, 'जब वी मेट',  'हायवे' यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीआपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर  या प्रोजेक्टबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली आहे. इतकंच नाहीतर या चित्रपटाच्या रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट १२ जून रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, अद्याप चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचं काम सध्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे. ए.आर. रहमान यांनी संगीत दिले आहे आणि इर्शाद कामिल यांनी गाणी लिहिली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा रोमकॉम चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे.

'ही' मराठमोळी अभिनेत्री आहे सोबतीला...

दिलजीत दोसांझच्या या आगामी प्रोजेक्टमध्ये मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ देखील असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय सिनेमात वेदांग रैना आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या प्रोजेक्टच्या माध्यमातून इम्तियाज अली आणि दिलजीत दोसांझ  दुसऱ्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांनी यापूर्वी 'अमर सिंह चमकिला'मध्ये एकत्र काम केलं होतं. 

Web Title : 'बॉर्डर २' के बाद दिलजीत दोसांझ की किस्मत चमकी, नई फिल्म का ऐलान!

Web Summary : 'बॉर्डर २' की सफलता के बाद, दिलजीत दोसांझ इम्तियाज अली की अगली फिल्म में शरवरी वाघ के साथ। फिल्म 12 जून को रिलीज होगी।

Web Title : Diljit Dosanjh's career soars after 'Border 2', new film announced!

Web Summary : Riding high on 'Border 2' success, Diljit Dosanjh teams up with Sharvari Wagh in Imtiaz Ali's next. Film releases June 12.