बॉलिवूड सेलिब्रिटींचे महागडे शानशौक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 12:29 IST2017-12-31T06:59:42+5:302017-12-31T12:29:42+5:30

अबोली कुलकर्णी  बॉलिवूड म्हणजे ग्लॅमर, पैसा, ब्रँड, महागड्या वस्तूंची लयलूट करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी. ऐशोआरामात, चैनीत राहण्याचे जे स्वप्न सामान्य ...

Bollywood celebrity's expensive Shanshok! | बॉलिवूड सेलिब्रिटींचे महागडे शानशौक!

बॉलिवूड सेलिब्रिटींचे महागडे शानशौक!

ong>अबोली कुलकर्णी 

बॉलिवूड म्हणजे ग्लॅमर, पैसा, ब्रँड, महागड्या वस्तूंची लयलूट करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी. ऐशोआरामात, चैनीत राहण्याचे जे स्वप्न सामान्य व्यक्ती पाहत असतात, तेच स्वप्न बॉलिवूडचे सेलिब्रिटी जगत असतात. सामान्य व्यक्तीला लहानातील लहान वस्तू घेताना खूप विचार करावा लागतो. मात्र, सेलिब्रिटींच्या बाबतीत तसे होत नाही. त्यांची प्रत्येक वस्तू महागडी आणि ब्रँडेड असते. कधी कधी एखादी वस्तू अगदी साधारण असते पण ती अमुक एका सेलिब्रिटीने घातली म्हटल्यावर त्याची किंमत साहजिकच वाढून जाते. अशातच काही सेलिब्रिटी हे त्यांच्या महागड्या शानशौकामुळे चर्चेत आल्या. घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींचा आढावा....



* अमिषा पटेल - बॅग

‘कहो ना प्यार हैं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल अलिकडेच तिच्या महागड्या बॅगमुळे चर्चेत आली. मुंबई विमानतळावर ती तिच्या या खूप महागड्या बॅगसोबत दिसून आली. अमिषाकडे असलेल्या या बॅगची किंमत सुमारे ७७५ डॉलरपेक्षाही जास्त आहे. आपल्याकडे त्याची किंमत ५०७१३ रूपयांपर्यंत असेल. या तिच्या बॅगमुळे ती मधल्या काळात बरीच चर्चेत आली. 



* करिना कपूर खान - जॅकेट

पतौडी घराण्याची लाडकी सून करिना कपूर खान ही कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. तिचे राहणीमान, आवडीनिवडी या सर्व गोष्टी फारच निवडक आणि विशिष्ट असतात. आता अलीकडेच ती विमानतळावर तिच्या फेव्हरेट जॅकेटमध्ये दिसली. मग मात्र त्या जॅकेटची चर्चा झाल्याशिवाय राहिली नाही. तिचे हे जॅकेट तब्बल ८५ हजारांचे होते. तिच्या आवडीचा ब्रँड ती नेहमीच घालणे पसंत करते.



* सुहाना खान - टिशर्ट 
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याची लाडकी लेक सुहाना खान हिचा थाट काही औरच असतो. घर असो किंवा सार्वजनिक ठिकाण ती तिच्या हटके अंदाजातच कायम दिसते. आता हेच बघा ना, अलिकडेच ती तिच्या टिशर्टच्या हॉट अंदाजामुळे चर्चेत आली. हा तिचा पांढºया रंगाचा टिशर्ट ६४ हजारांचा होता. सुहाना आता लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून त्याचीच तयारी तिने आता सुरू केलीय, असे म्हणायला हरकत नाही.

 * आलिया भट्ट - ड्रेसिंग 
बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट ही तिच्या अभिनयाने कायम चर्चेत असते. भूमिकांना न्याय देणारी आणि प्रत्येक प्रकारची भूमिका लीलया वठवणारी अशी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. अलिकडेच  ती विमानतळावर दिसून आली. तेव्हा तिने घातलेल्या अ‍ॅक्सेसरीजची गोळाबेरीज केली तर लाखो रूपयांच्या घरात जाईल हे निश्चित. तिने घातलेला आर्मीचा शर्ट हा ५०४२३ एवढया किंमतीचा आहे. तर तिची बॅग ही दोन लाख रूपयांची आहे. तसेच तिचे बूट हे ४० हजारांचे आहेत. थोडक्यात काय तर २ लाख ९० हजार रूपये खर्चायची नक्कीच तुम्हाला तयारी ठेवावी लागेल.



* आराध्या बच्चन - फ्रॉक

माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय बच्चन हिची मुलगी आराध्या बच्चन ही अशातच तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चेत आली. चर्चा अशी होती की, ऐश्वर्या-अभिषेक यांनी त्यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर तिचा बर्थडे मोठया थाटामाटात सेलिब्रेट केला. यावेळी आराध्याने घातलेल्या फ्रॉकची विशेष चर्चा झाली. तिचा फ्रॉक तब्बल ६० हजारांचा होता. कुणाचेही डोळे दिपून जातील असा हा वाढदिवसाचा सोहळा बी-टाऊनच्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडला. 

Web Title: Bollywood celebrity's expensive Shanshok!