कुर्रर्रर्र...! लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने महिनाभरातच जाहीर केलं मुलीचं नाव, फोटोही केला शेअर, कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 11:55 IST2026-05-19T11:52:30+5:302026-05-19T11:55:32+5:30

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्रीच्या घरी लक्ष्मीचं आगमन,  महिनाभरातच लेकीचं नाव केलं जाहीर, म्हणाली...

bollywood actress shivaleeka oberoi and abhishek pathak revealed baby girl name aarika pathak shares post on social media | कुर्रर्रर्र...! लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने महिनाभरातच जाहीर केलं मुलीचं नाव, फोटोही केला शेअर, कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

कुर्रर्रर्र...! लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने महिनाभरातच जाहीर केलं मुलीचं नाव, फोटोही केला शेअर, कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Shivaleeka Oberoi Post: गेल्या काही दिवसांत बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकारांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. कलाविश्वातील कुणाकडे मुलगा जन्मला आहे; तर कुणाकडे मुलगी. या कलाकारांनी त्यांची अनोखी नावंही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केली आहेत. अशातच एका लोकप्रिय  बॉलिवूड नायिकेनं तिच्या लाडक्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे शिवालिका ओबेरॉय आहे. 


लग्नाच्या तीन वर्षांनंतर, 'दृश्यम २' सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय यांच्या घरी पाळणा हलला आहे. शिवालीने गोंडस मुलीला जन्म दिला. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ( १९ एप्रिल २०२६ ) शिवालिका आणि अभिषेक यांना कन्यारत्न झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी या जोडप्याने त्यांच्या सगळ्या चाहत्यांना दिली होती. अशातच आता लेकीच्या जन्मानंतर या दाम्पत्याने लाडक्या मुलीचं नामकरण केलं आहे. आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लिहिलंय,"आमच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वरदान... अरिका पाठक", आरिका ही देवी लक्ष्मीचा अंश धारण करते, जी कृपा,  समृद्धी आणि दिव्य सौंदर्याचे प्रतीक आहे. १९.०४.२०२६ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी जन्मलेल्या माझ्यासाठी, हे सर्व इतके सुंदर आणि दैवीरीत्या जोडलेले वाटते, जणू काही ब्रह्मांडाने हे आधीपासूनच योजिले होते." अशी सुंदर पोस्ट तिने शेअर केली आहे. 

दरम्यान, अभिनेत्रीच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील कलाकारांसह अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स  करत शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्कफ्रंट 

अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय आणि अभिषेक पाठक यांचा जुलै २०२२ मध्ये साखरपुडा झाला आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं. अभिषेक पाठकच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं 'रेड', 'प्यार का पंचनामा' आणि 'दृश्यम २' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्याचबरोबर अभिषेकनं 'खुदा हाफिज' आणि 'उजडा चमन' यांसारख्या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 

Web Title : शिवालिका ओबेरॉय ने बेटी का नाम बताया, फोटो शेयर की, बधाइयां उमड़ीं

Web Summary : अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय और अभिषेक पाठक ने अपनी बेटी का नाम आरिका पाठक बताया, जो अक्षय तृतीया पर पैदा हुई। लक्ष्मी का प्रतिनिधित्व करने वाली आरिका आशीर्वाद लाती है। दंपति ने सोशल मीडिया पर एक तस्वीर साझा की, जिस पर उद्योग के सहयोगियों और प्रशंसकों ने शुभकामनाएं दीं।

Web Title : Shivaleeka Oberoi Reveals Baby Girl's Name, Shares Photo, Blessings Pour In

Web Summary : Actress Shivaleeka Oberoi and Abhishek Pathak revealed their daughter's name, Arika Pathak, born on Akshaya Tritiya. Arika, representing Lakshmi, brings blessings. The couple shared a picture on social media, receiving wishes from industry colleagues and fans.