"त्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज...", लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सारा अली खानने मांडलं मत, काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:53 IST2026-05-18T16:48:27+5:302026-05-18T16:53:43+5:30
"जेव्हा योग्य वेळ येईल,तेव्हा…", लग्नाबाबत सारा अली खान स्पष्टच बोलली, म्हणते- "सध्या मला..."

"त्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज...", लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सारा अली खानने मांडलं मत, काय म्हणाली?
Sara Ali Khan: बॉलिवूडची 'चुलबुली गर्ल'म्हणून अभिनेत्री सारा अली खान ओळखली जाते.सारा अली खान तिच्या चित्रपटांसह अनेकदा वैयक्तिक आयु्ष्यामुळे चर्चेत येत असते. सध्या 'पति पत्नी और वो दो' या तिच्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. हा चित्रपट १५ रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान, एका मुलाखतीत साराने चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल आणि लग्नाबद्दल आपले विचार उघडपणे व्यक्त केले आहेत.
अभिनेत्री सारा अली खान ३० वर्षांची आहे, पण तरी देखील अभिनेत्री सिंगल आहे… सारा हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. नुकतीच तिने न्यूज 18 ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लग्नाबद्दल स्वतःचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तिने म्हटलं," तुम्ही तुमच्या अनुभवातून आणि आजूबाजूला जे घडतंय त्याकडे पाहून निर्णय घेता. तुमचे सर्वच निर्णय बरोबर असू शकत नाही. काही निर्णय चुकीचे देखील असतात. यापेक्षा तुम्ही वाट बघा आणि योग्य व्यक्तीसोबत लग्न करा."
यापुढे सारा म्हणाली,"मला आयुष्य पूर्ण करण्यासाठी किंवा एकटेपणातून सुटका मिळवण्यासाठी मला पुरुषाची गरज नाही. मी स्वत:परिपूर्ण आहे. त्यामुळे मला कोणाचीही गरज वाटत नाही. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हाच मी लग्न करेन.ज्यामुळे मी माझं आयुष्य लग्न न करताही चांगल्या प्रकारे जगूच शकते.स्वतःला पूर्ण करण्यासाठी मला कोणाची गरज नाही आणि कोणाच्या शोधात देखील नाही."
"सध्या मला माझ्या करियरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. यादरम्यान कोणती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली तर, मी विचार करेन. कारण घाईघाईत केलेलं काम कधीच योग्य ठरत नाही."असं देखील सारा अली खानने यावेळी सांगितलं.