"खूप प्रयत्न करावे लागले...", अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 'अशी' झालेली कल्किची अवस्था, सांगितलं काय घडलेलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:50 IST2026-04-24T12:48:28+5:302026-04-24T12:50:33+5:30
प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत घटस्फोट, थेरपी घेण्याची आली वेळ! बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा, नात्याबद्दल म्हणाली...

"खूप प्रयत्न करावे लागले...", अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 'अशी' झालेली कल्किची अवस्था, सांगितलं काय घडलेलं
Actress Kalki Koechlin: 'देव डी','य जवानी है दिवानी'यांसारख्या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे कल्कि कोचलिन.फिल्मी करिअरसोबत कल्की कोचलीन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळंही चर्चेत असते. तिनं प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत २०११ साली लग्न केलं होतं. पण लग्नानंतर दोनच वर्षात त्यांच्या घटस्फोट झाला.त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. कल्कि तिच्या अभिनयासह स्पष्ट वक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. सध्या एका मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य केलं आहे.
'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तिने एक्स पती अनुराग कश्यपसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. त्याचबरोबर घटस्फोटानंतर कशी परिस्थिती होती, तसेच मानसिक आरोग्याबद्दल सुद्धा सांगितलं.घटस्फोटाबद्दल बोलताना कल्की म्हणाली,"खूप प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत केवळ थेरपी पुरेशी नसते. जेव्हा तुम्ही आयुष्यातील एखाद्या कठीण अनुभवातून जात असता, तेव्हा कधीकधी थेरपीसुद्धा घेणं सुद्धा अवघड वाटू शकतं. अशा वेळी आपले दुःखाला अनुभवणं अत्यंत गरजेचं असतं.थेरपी ही दीर्घकाळीन मदत करते, त्यामुळे मी थेरपी घेण्याचाही पर्याय नक्की सुचवेन."
दरम्यान, कल्कि असंही म्हणाली की,वेगळे झाल्यानंतर एकमेकांमध्ये अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे राग आणि वेदना व्यक्त करण्याऐवजी तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायला अधिक वेळ मिळतो.खऱ्या अर्थानं या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी वेळेची गरज असते.
घटस्फोटाबद्दल कल्कि काय म्हणाली...
घटस्फोटाबद्दल कल्कि म्हणाली,"सुरुवातीची काही वर्षे कठीण गेली, असं तिने सांगितलं. पण, आपण एकमेकांच्या आयुष्यापासून दूर झालं पाहिजे, याची वेळीच आम्हाला जाणीव झाली."