झोप उडाली अन् मन अस्थिर झालं...; कल्की कोचलिनने सांगितला 'तो' वेदनादायी काळ, म्हणाली-"चार महिने ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:33 IST2026-04-21T12:23:14+5:302026-04-21T12:33:58+5:30
"रात्री २-३ वाजता झोपेतून उठायचे...", त्या कठीण काळाबद्दल कल्की कोचलिन पहिल्यांदाच बोलली

झोप उडाली अन् मन अस्थिर झालं...; कल्की कोचलिनने सांगितला 'तो' वेदनादायी काळ, म्हणाली-"चार महिने ..."
Kalki koechlin: कल्की कोचलिन ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'देव डी','डायन','ये जवानी है दिवानी' आणि 'भय' यांसारख्या चित्रपटांसाठी ती ओळखली जाते.विशेषत ये जवानी है दिवानी या चित्रपटातील तिची आदिती ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आजवर अनेक कलाकृतींच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं आहे.
अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कल्की कोचलिननं तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केलं आहे. ऑल अबाऊट हर पॉडकास्टमध्ये त्या कटू आठवणींबद्दल सांगताना कल्कीने म्हटलं, एका वेदनादायी ब्रेकअपनंतर तिला अनेक महिने निद्रानाशाचा त्रास सहन करावा लागला होता. तेव्हा ती म्हणाली,"त्या घटनेनंतर मी कित्येक महिने निद्रानाश सारख्या समस्येने त्रस्त होते. या सगळ्या गोष्टींचा तुमच्या किती मानसिक परिणाम होऊ शकतो, हे माझ्या लक्षात आलं.या काळात मला झोप लागत नव्हती आणि रात्री २-३ वाजता जाग येत असे. त्यानंतर पुन्हा झोप येत नसल्याने मी गिटार वाजवत बसायचे किंवा स्वतःला इतर कामांमध्ये गुंतवून ठेवत असे.कारण, त्यामुळे मला पुन्हा झोप लागणं अवघड व्हायचं."
मात्र, या समस्येचा कामावरही परिणाम झाला का यावर बोलताना कल्किने सांगितलं," जेव्हा मला कामावर जायचं असायचं त्यावेळेस मलाच कळायचं नाही.आपण स्वप्नात आहोत की प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी आहोता,असा गोंधळ निर्माण व्हायचा. हा त्रास जवळपास चार महिने सुरू होता." असा धक्कादायक खुलासही तिने केला.
यावेळी कल्कीने कोणाचंही नाव घेणं टाळलं. मात्र, तिचे नाव दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत जोडले गेले होते.देव डी या चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं होतं.याच चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दरम्यान तिची अनुराग कश्यपशी ओळख झाली.त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी विवाह केला. पण, हे नातं फार काळ टिकलं नाही. अखेर २०१३ मध्ये ते वेगळे झाले आणि त्यांचा घटस्फोट झाला.