'फटा पोस्टर निकला...',जॅकी श्रॉफ यांचा नवा सिनेमा 'या' तारखेला होणार प्रदर्शित, पोस्टर पाहिलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:34 IST2026-05-08T16:31:01+5:302026-05-08T16:34:35+5:30
आजोबांच्या भूमिकेत दिसणार जॅकी श्रॉफ, नव्या सिनेमाच्या पोस्टरने वेधलं लक्ष, कधी होणार प्रदर्शित?

'फटा पोस्टर निकला...',जॅकी श्रॉफ यांचा नवा सिनेमा 'या' तारखेला होणार प्रदर्शित, पोस्टर पाहिलंत का?
Jackie Shroff New Movie: ऐंशी, नव्वदच्या दशकामधील सुपरहीट अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांचे नाव टॉपला आहे. जवळपास चार दशकं सिनेसृष्टीमध्ये काम करत प्रेक्षकांना त्यांनी आपलसं केलं. इतकच नव्हे तर रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारत त्यांनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्पा अनुभवणाऱ्या जॅकी यांनी अनेक सिनेमांत उत्तम अभिनय केला आहे. जॅकी श्रॉफ यांनी फक्त बॉलीवूड किंवा दक्षिणेतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.आता जॅकी श्रॉफ मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक आगळी-वेगळी गोष्ट घेऊन ते लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत आहेत.
नुकतंच त्यांच्या आगामी 'द ग्रेट ग्रॅंड सुपरहिरो' या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या रिलीज डेटही जाहिर करण्यात आली आहे.'द ग्रेट ग्रॅंड सुपरहिरो' चित्रपटात जॅकी श्रॉफ सुपरहिरो आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या पोस्टरमध्ये जॅकी श्रॉफ एका वयोवृद्ध माणसाच्या लूकमध्ये दिसत आहेत. "फटा पोस्टर निकला, सुपरहिरो दादाजी...", असं लक्षवेधी कॅप्शन देत हे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं गेलं आहे. हे पोस्टर पाहून सिनेमाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढल्याची पाहायला मिळतेय.
दरम्यान, 'द ग्रेट ग्रॅंड सुपरहिरो' हा चित्रपट यावर्षी २९ मे रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात प्रतीक स्मिता पाटील, भाग्यश्री दासानी, शरत सक्सेना, मिहिर गोडबोले या कलाकारांच्याही भूमिका आहेत.