अभिनेता अक्षय कुमार रुग्णालयात दाखल, पार पडली 'ही' शस्त्रक्रिया, नेमकं झालं तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 08:56 IST2026-05-07T08:48:57+5:302026-05-07T08:56:53+5:30
अभिनेता अक्षय कुमारच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया, दिसणंही कमी झालेलं अन्...; नेमकं काय झालं?

अभिनेता अक्षय कुमार रुग्णालयात दाखल, पार पडली 'ही' शस्त्रक्रिया, नेमकं झालं तरी काय?
Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या भूत बंगला या चित्रपटाच्या यशामुळे लाइमलाईटमध्ये आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही जोडी बऱ्याच प्रतीक्षेनंतर एकत्र आली आहे.यानंतर अक्षय अनीस बज्मी यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्याचा पाहायला मिळाला. दरम्यान, अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. या अभिनेत्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झालेली आहे. नेमकी त्याच्यावर कसली शस्त्रक्रिया झाली ? जाणून घेऊया...
फिटनेस फ्रिक असलेल्या अक्षय कुमारची अलिकडेच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला डोळ्याने पाहताना त्रास होत होता. त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया पार पडली आहे. या शस्त्रक्रियेमुळे अक्षयने आपल्या आरोग्याला प्राधान्य दिले असून कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार," बुधवार, ६ मे रोजी सकाळी एक छोटी शस्त्रक्रिया झाली. ती दृष्टी सुधारण्यासाठी होती. अक्षय आता विश्रांती घेणार आहे, कारण त्याने त्याच्या 'केरळम' या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे, ज्यात विद्या बालन आणि राशी खन्ना देखील आहेत. अभिनेत्याच्या शस्त्रक्रियेबद्दल समजातच त्याचे चाहते चिंतेत आहेत.
अक्षय कुमार आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तितकाच चर्चेत असतो. सध्या त्याचे 'हैवान', 'गोलमाल ५', 'वेलकम टू द जंगल' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.