"मी अचानक खूप आजारी पडलो, अन्...", अक्षय कुमारला वैष्णोदेवी यात्रेत आलेला 'असा' अनुभव, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:05 IST2026-04-15T12:01:36+5:302026-04-15T12:05:28+5:30
अक्षय कुमार सध्या त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याने त्याच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला.

"मी अचानक खूप आजारी पडलो, अन्...", अक्षय कुमारला वैष्णोदेवी यात्रेत आलेला 'असा' अनुभव, म्हणाला...
Akshay Kumar: हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट करणार्या कलावंतांमध्ये सध्या आघाडीवर असणारा खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. 'यह दिल्लगी', 'मोहरा', 'मै खिलाडी तू अनाडी', 'दिल तो पागल है', 'हेरा फेरी', 'खाकी', 'मुझसे शादी करोगी', 'नमस्ते लंडन', 'हे बेबी', 'भुल भुलय्या', 'सिंग इज किंग' असे सुपरहिट सिनेमे त्याने इंडस्ट्रीला दिले आहेत.गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे.भूत बंगला या सिनेमातून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अक्षय कुमार सध्या त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याने त्याच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला, ज्यामुळे सर्वच जण चकित झाले.अक्षय 'HT City' ला दिलेल्या मुलाखतीत बालपणीचा तो किस्सा शेअर करत म्हणाला, वैष्णों देवीला जाऊन त्याच्या पालकांनी खास प्रार्थना केली, ‘आम्हाला मूल दे, पण ते खोडकर असावं. आणि एका वर्षानंतर माझा जन्म झाला.” अक्षयच्या पहिल्या वाढदिवसानंतर, त्याच्या आईवडिलांनी नवस फेडण्यासाठी वैष्णो देवीला जायचं ठरवलं. त्याबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला,माझे आई-वडील मला त्यांच्यासोबत घेऊन गेले, पण वाटेत मी अचानक खूप आजारी पडलो.मला खूप ताप होता, आधी १०३ ते १०४ डिग्री ताप आला आणि मी बेशुद्ध झालो.कटरामधील डॉक्टरांनी त्यांना मला दिल्लीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. ही १९६९ सालची गोष्ट आहे, आणि त्या वेळी कटरामध्ये योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या.
पुढे त्याने सांगितलं, "या गंभीर परिस्थितीतही, अक्षयच्या आईचा विश्वास अढळ होता.त्यांचा विश्वास होता.जर देवीने आम्हाला हा मुलगा दिला असेल आणि जर तिची इच्छा असल्यास ती त्याला परत घेऊ शकते. पण आम्ही मागे फिरणार नाही; आम्ही मंदिराकडे आमचा प्रवास सुरूच ठेवू." मग अक्षयने सांगितलं, त्यावेळी मला लाल रंगाचा फ्रॉक घातला होता.जो आजही माझ्यासोबत आहे, आणि मी बेशुद्ध होतो. त्यांनी मला मंदिरात अंघोळ घातली, प्रार्थना करत असतानाच त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते."
या क्षणी, एक अनोळखी व्यक्ती अक्षयच्या वडिलांकडे येऊन म्हणाला, "तुमच्या मुलाचं हास्य किती गोड आहे.त्याचवेळी माझ्या वडिलांनी माझ्याकडे पाहिलं तर मी हसत होतो. विशेष म्हणजे माझ्या अंगातील ताप उतरला. मी पूर्णपणे ठीक होतो. त्यांनी मला कोणते औषध दिले हे मला माहीत नाही, पण तिथल्या ऊर्जेमध्ये असे काहीतरी होतं ज्यामुळे मला बरं वाटलं." असा अनुभव अभिनेत्याने शेअर केला.