मुंबईत बिपाशा-करणचे ‘शुभ मंगल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:43 IST2016-04-30T16:44:48+5:302016-05-01T00:43:52+5:30

शनिवरी बिपाशा-करण लग्नाच्या बंधनात अडकले. खाजगी सोहळ्यात दोघांनी सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. 

Bipasha-Karan's 'Shubh Mangal' in Mumbai | मुंबईत बिपाशा-करणचे ‘शुभ मंगल’

मुंबईत बिपाशा-करणचे ‘शुभ मंगल’

ल्या काही दिवसांपासून बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोव्हर यांच्या लग्नाचा टॉपिक चांगलाचा गाजतोय. अखेर शनिवरी ते लग्नाच्या बंधनात अडकले. खाजगी सोहळ्यात दोघांनी सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. पंजाबी आणि बंगाली अशा दोन्ही विधींनी लग्नसोहळा पार पडला.

पारंपरिक बंगाली वेशभुषेत बिपाशा अतिशय सुंदर दिसत होती. डोक्यावर पांढरे ‘टिआरा’ आणि माथी चंदनाने ती सजलेली होती. मात्र संपूर्ण सोहळ्यात लक्षवेधले ते करणसिंगने. नवरदेवांनी घोड्यावर बसून नाही तर सेगवे हॉव्हरबोर्डवर पांढरी शेरवानी घालून लग्नमंडपात एन्ट्री केली.

मेहंदी आणि संगीत कार्यक्रमाच्या वेळी काढलेल्या करण-बिपाशाच्या फोटोंनी मंडपाची कमान सजवण्यात आली होती. पाहुणेमंडळींत बिपाशाचा एक्स बॉयफ्रेंड डिनो मोरिया, मॉडेल कँडाईस पिंटो यांचा सामावेश होता. सपना मोती भवानीने इन्टाग्रामवर या बिपाशाचा लग्नातील फोटो शेअर केला.


गुरुवारी बिपाशाच्या घरी बंगाली परंपरेनुसार लग्नकार्यात केल्या जाणाºया सर्व विधी करण्यात आल्या. शुक्रवारी झालेल्या संगीत सेरेमोनीमध्ये शिल्पा व शमिता शेट्टी, अनुषा दांडेकर यांनी तिच्यासोबत भरपूर धमाल केली. जॉन अब्राहमशी ब्रेक अप झाल्यावर बिपाशाचे ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर करणशी सुत जुळले होते.

Web Title: Bipasha-Karan's 'Shubh Mangal' in Mumbai