अक्षय-प्रियदर्शनची जादू चालली! 'भूत बंगला'ची अवघ्या ४ दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई; एकूण कलेक्शन किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 09:03 IST2026-04-21T09:00:51+5:302026-04-21T09:03:56+5:30

विकेंडनंतर काल सोमवारी वर्किंग डे असूनही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची पकड मजबूत राहिली.

Bhoot Bungla Box Office Collection Day 4 Akshay Kumar Priyadarshan 100 Crore | अक्षय-प्रियदर्शनची जादू चालली! 'भूत बंगला'ची अवघ्या ४ दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई; एकूण कलेक्शन किती?

अक्षय-प्रियदर्शनची जादू चालली! 'भूत बंगला'ची अवघ्या ४ दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई; एकूण कलेक्शन किती?

Bhoot Bungla Box Office Collection Day 4: बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आणि दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन या जोडीने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे. या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'भूत बंगला' (Bhoot Bungla) या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई करत सर्वांना थक्क केले आहे.

'भूत बंगला'च्या निर्मात्यांनी प्रदर्शनापूर्वी, गुरुवारी (१६ एप्रिल) पेड प्रिव्ह्यू आयोजित केला होता, ज्यातून ४.५० कोटींची कमाई झाली. त्यानंतर शुक्रवारी पहिल्याच दिवशी चित्रपटाने २३.९० कोटींची ओपनिंग घेतली. शनिवार आणि रविवारी सुट्ट्यांचा फायदा घेत चित्रपटाने ३२.१० कोटी आणि ३५.३७ कोटींचा गल्ला जमवला.

विकेंडनंतर सोमवारी वर्किंग डे असूनही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची पकड मजबूत राहिली आणि १०.४७ कोटींची कमाई झाली. यासह चित्रपटाने केवळ चार दिवसांत १०६.३४ कोटींचा जागतिक आकडा पार करत '१०० कोटी क्लब'मध्ये प्रवेश केला आहे. केवळ भारताचा विचार केल्यास चित्रपटाचे नेट कलेक्शन ६४.७५ कोटींच्या घरात पोहोचले आहे.

परदेशातही अक्षयचा डंका
१२० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'भूत बंगला'ने केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही चांगली कामगिरी केली आहे. ओव्हरसीज मार्केटमध्ये आतापर्यंत २९ कोटींची कमाई झाली असून आखाती देश आणि उत्तर अमेरिकेत चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Web Title : अक्षय-प्रियदर्शन की 'भूत बंगला' ने चार दिनों में ₹100 करोड़ कमाए!

Web Summary : अक्षय कुमार और प्रियदर्शन की 'भूत बंगला' ने बॉक्स ऑफिस पर धमाल मचा दिया, सिर्फ चार दिनों में दुनिया भर में ₹100 करोड़ से अधिक की कमाई की। घरेलू और विदेशी प्रदर्शन ने हॉरर-कॉमेडी को ₹100 करोड़ क्लब में पहुंचाया।

Web Title : Akshay-Priyadarshan's 'Bhoot Bungla' hits ₹100 crore in four days!

Web Summary : Akshay Kumar and Priyadarshan's 'Bhoot Bungla' stormed the box office, earning over ₹100 crore worldwide in just four days. Strong domestic and overseas performance propelled the horror-comedy into the ₹100 crore club, with impressive collections even on a working Monday.