Bhoot Bangla Box Office: अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ची बक्कळ कमाई, तीन दिवसांत कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:30 IST2026-04-20T10:18:59+5:302026-04-20T10:30:44+5:30
बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. अनेक वर्षांनी अक्षय कुमारचा एखादा चित्रपट पहिल्याच वीकेंडला इतकी दमदार कामगिरी करताना दिसत आहे

Bhoot Bangla Box Office: अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ची बक्कळ कमाई, तीन दिवसांत कमावले 'इतके' कोटी
बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. अनेक वर्षांनी अक्षय कुमारचा एखादा चित्रपट पहिल्याच वीकेंडला इतकी दमदार कामगिरी करताना दिसत आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात चांगली कमाई केल्याचं दिसतंय.
पहिल्या वीकेंडचे कलेक्शन
रिपोर्टनुसार, 'भूत बंगला'ने आपल्या पहिल्या तीन दिवसांत म्हणजेच पहिल्या वीकेंडला प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचण्यात यश मिळवले आहे. चित्रपटाने पहिल्या वीकेंडला जगभरात ५० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. भारतात देखील या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत साधारण ३० ते ३५ कोटींच्या दरम्यान कमाई केली असून, रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५८ कोटींवर पोहोचले आहे.
अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची जोडी पुन्हा यशस्वी अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही जोडी तब्बल १४ वर्षांनंतर एकत्र आली आहे. यापूर्वी त्यांनी 'हेरा फेरी', 'भूल भुलैया' आणि 'गरम मसाला' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'भूत बंगला'च्या माध्यमातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली असून, प्रेक्षकांकडून मिळणारा उदंड प्रतिसाद चित्रपटाच्या पथ्यावर पडत आहे.
तगडी स्टारकास्ट
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत तब्बू, वामिका गब्बी, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. राजपाल यादव आणि अक्षय कुमारची जुगलबंदी प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यास भाग पाडत आहे. चित्रपटातील हॉरर आणि कॉमेडी प्रेक्षकांना आवडत आहे. वीकेंडला चित्रपटाने चांगली कमाई केली असली, तरी आता 'मंडे टेस्ट' म्हणजेच सोमवारच्या कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर चित्रपटाने या दिवसांतही आपली पकड मजबूत ठेवली, तर हा चित्रपट अक्षय कुमारच्या करिअरमधील मोठा हिट ठरू शकतो.