​​‘तेज रफ्तार’मध्ये दिसणार ‘अशोका फेम ’ सिद्धार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 19:08 IST2016-05-02T13:38:27+5:302016-05-02T19:08:27+5:30

‘अशोका फेम ’ सिद्धार्थ निगम लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. किंग एन्टटेन्मेंटच्या ‘तेज रफ्तार’ या चित्रपटातून सिद्धार्थ मोठ्या पडद्यावर ...

'Ashoka Fame' will appear in 'Big Speed', Siddhartha | ​​‘तेज रफ्तार’मध्ये दिसणार ‘अशोका फेम ’ सिद्धार्थ

​​‘तेज रफ्तार’मध्ये दिसणार ‘अशोका फेम ’ सिद्धार्थ

शोका फेम ’ सिद्धार्थ निगम लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. किंग एन्टटेन्मेंटच्या ‘तेज रफ्तार’ या चित्रपटातून सिद्धार्थ मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा शुभारंभ मुंबईत पार पडला. चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट शिवाय अभिनेत्री श्वेता खंडुरी व स्मिता गोंडकर यावेळी उपस्थित होते.‘तेज रफ्तार’ हा चित्रपट एका गरिब मुलाची कथा आहे. झोपडपट्टीत जन्मलेल्या या मुलावर  एका नामांकित अ‍ॅथलिट कोचची नजर पडते आणि इथून पुढे झोपडीत राहणाºया या मुलाचे नशीबच पालटते, अशी ही कथा आहे. यशाचा ध्यास आणि त्यासाठीचा संघर्ष अशा वळणाचा हा चित्रपट आहे.कौशिक गून आणि किंगशूक गून यांनी जाणीवपूर्वक या मुलाच्या भूमिकेसाठी सिद्धार्थची निवड केली. सिद्धार्थने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचे कसब सिद्ध केले आहे. आता सिद्धार्थ मोठ्या पडद्यावरही आपले अभिनय सिद्ध करण्यास सज्ज झाला आहे. सुनंदा मित्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाºया या चित्रपटात  समीर सोनी, हृशिता भट्ट, जन्नत झुबैर रहमानी, मुश्ताक खान, अंजन श्रीवास्तव आदी स्टारकास्ट आहे.




स्वत:च्या फिटनेसबाबत अतिशय सजग असलेला सिद्धार्थ या चित्रपटाबद्दल अतिशय उत्साही आहे.  चित्रपटात अ‍ॅथलिटची मध्यवर्ती भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हान आहे. माझ्या या पहिल्या वहिल्या भूमिकेबद्दल मी अतिशय उत्साही आहे, असे सिद्धार्थ म्हणाला.

Web Title: 'Ashoka Fame' will appear in 'Big Speed', Siddhartha