अरिजीत सिंहच्या पहिल्या पत्नीला पाहिलंत का? संगीत शोमध्ये झालेली ओळख, प्रेमात पडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:37 IST2026-01-28T16:36:45+5:302026-01-28T16:37:29+5:30
पहिल्या पत्नीने गेल्या वर्षीच अरिजीतसोबतचा जुना फोटो पुन्हा शेअर केला होता.

अरिजीत सिंहच्या पहिल्या पत्नीला पाहिलंत का? संगीत शोमध्ये झालेली ओळख, प्रेमात पडले अन्...
गायक अरिजीत सिंह अचानक चर्चेत आला आहे. ज्याच्या गाण्यावर तरुणाई वेडी होते त्या अरिजीत सिंहने अचानक प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्काच बसला. मात्र अरिजीतला आता फिल्ममेकिंग करायचं आहे. तो एका पॅन इंडिया सिनेमावर काम करत आहे. पत्नी कोयल सोबत मिळून त्याने याची कथा लिहिली आहे. पण तुम्हाला अरिजीतच्या पहिल्या पत्नीविषयी माहितीये का?
अरिजीतच्या पहिल्या पत्नीचं नाव रुपरेखा बॅनर्जी आहे. २००५ साली 'फेम गुरुकुल' या संगीत रिएलिटी शोमध्ये अरिजीत आणि रुपरेखा दोघंही सहभागी झाले होते. तिथेच त्यांची ओळख झाली. दोघांनी करिअरची नुकतीच सुरुवात केली होती. संगीत हे त्यांचं पॅशन होतं. शोच्या वेळी त्यांच्या मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. शो संपल्यानेतर दोघांनी लग्नही केलं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. करिअरचा दबाव, अस्थिरता आणि वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांच्यात दुरावा वाढला. काही वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला. असं म्हणतात की तो काळ अरिजीतसाठी खूप कठीण होता ज्याबद्दल तो कधीच कुठेही बोलला नाही.

घटस्फोटानंतर रुपरेखा लाईमलाइटपासून दूर गेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुपरेखा कोलकतामध्ये राहते आणि आजही ती संगीत क्षेत्राशी जोडलेली आहे. ती स्टेज परफॉर्मन्स करते ज्याचे अपडेट ती फेसबुकवर शेअर करते. शिवाय ती संगीत शिक्षिकाही आहे. सोशल मीडियावर ती थोडीफार अॅक्टीव्ह असते.
अरिजीतने नंतर कोयलसोबत दुसरं लग्न केलं. तसंच रूपरेखाही तिच्या आयुष्यात पुढे गेली. तिनेही दुसरा संसार थाटला. नलिनाक्ष्या भट्टाचार्य असं तिच्या दुसऱ्या पतीचं नालं आहे. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव सिरीन आहे. रुपरेखा अनेकदा लेकीसोबतचे फोटो शेअर करत असते. गेल्या वर्षी रुपरेखाने एक जुना फोटो पोस्ट केला होता ज्यात अरिजीतही दिसत आहे. गुरुकुलच्या आठवणी ती शेअर करते. याशिवाय ती अरिजीतची गाणीही पोस्ट करते.