​अनिल- अर्जुन ‘मुबारका ’मध्ये एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 19:44 IST2016-08-04T14:14:27+5:302016-08-04T19:44:27+5:30

अभिनेता अनिल कपूर व अर्जुन कपूर हे दोघे  नात्याने काका -  पुतणे आहेत.ते  पहिल्यादांच सोबत पडद्यावर  अनीस बज्मी दिग्दर्शित ...

Anil - Arjun together in 'Mubaraka' | ​अनिल- अर्जुन ‘मुबारका ’मध्ये एकत्र

​अनिल- अर्जुन ‘मुबारका ’मध्ये एकत्र


/>अभिनेता अनिल कपूर व अर्जुन कपूर हे दोघे  नात्याने काका -  पुतणे आहेत.ते  पहिल्यादांच सोबत पडद्यावर  अनीस बज्मी दिग्दर्शित ‘मुबारका’ या चित्रपटात दिसणार आहेत.  यामध्येही ते काका - पुतण्याचीच भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे दोघेही हसताना यामध्ये दिसणार आहेत. कारण की, अनीस बज्मी हे शक्यतो कॉमेडीच चित्रपट करतात. या चित्रपटाची शुटींग ही आॅक्टोबरमध्ये सुरु होत असून,यामध्ये अभिनेत्री म्हणून सोनाक्षी सिंहा हिस  घेण्याची चर्चा सुरु आहे. सूत्रांनुसार यासंदर्भात दिग्दर्शक अनीस बज्मी हे सोनाक्षीला भेटलेले असून, त्यांनी तिला संपूर्ण स्टोरीही सांगितली आहे. सोनाक्षीने सुद्धा या चित्रपटासाठी इंटरेस्टिंग असल्याचे कळते. मात्र, तिने अजून होकार दर्शविलेला नाही. मुबारका चे दिग्दर्शन अगोदर ‘मस्तीजादे’ चे दिग्दर्शक मिलाप जवेरी हे अभिषेक बच्चनला घेऊन करणार होते. परंतु, नंतरला याचे दिग्दर्शक अनीस बज्मी झाले. त्यामुळे कलाकारही बदलण्यात आले व अर्जुन कपूरची निवड यामध्ये झाली. 

Web Title: Anil - Arjun together in 'Mubaraka'