सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूने बिग बींना बसला धक्का, म्हणाले - सुशांत तू आयुष्य का संपवले?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:03 PM2020-06-15T17:03:59+5:302020-06-15T17:44:25+5:30
सुशांत यापुढे या जगात नाही यावर विश्वास ठेवण्यास अमिताभ बच्चन यांना कठीण जाते आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी ऐकून संपूर्ण बॉलिवूड स्तब्ध झाले आहे. सुशांत यापुढे या जगात नाही यावर विश्वास ठेवण्यास अमिताभ बच्चन यांना कठीण जाते आहे. त्यानी सुशांतसाठी एक मोठी पोस्ट लिहिली आहे. बिग बीनी सुशांतसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, "का ... का ... का?" सुशांतसिंग राजपूत तू आयुष्य का संपवले?, तू एक सर्वोत्तम अभिनेता होता. तू काहीही न बोलता, काहीही न मागता कायमसाठी झोपून गेलास.
चित्रपट 'एम.एस. धोनीमधील त्यानी केलेल्या कामाचे कौतुक केले
बिग बी लिहितात, मी ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’सिनेमा संपूर्ण बघितला. सुशांत जेव्हा ही बोलला किंवा संवाद साधला, तेव्हा त्याच्या आत काहीतरी होते जे सांगायचे राहून गेले.
सुशांतच्या भेटी किस्सा देखील त्यांनी सांगितला
या भेटीबाबत अमिताभ लिहितात, त्याला एका भेटी दरम्यान मी विचारले होते की, इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये महेंद्र सिंग धोनीने मारलेला शॉर्ट तो कसा मॅनेज केलास. यावर त्याचे उत्तर होते की मी तो धोनीचा व्हिडीओ 100 वेळा बघितला होता.