एक विमान आणि ब्लाइंड लँडिंग..., अजय देवगणच्या ‘Runway 34’ चा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:13 PM2022-03-21T17:13:00+5:302022-03-21T17:13:39+5:30

Runway 34 trailer: 'रनवे 34' चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. येत्या 29 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाये.

amitabh bachchan ajay devgn rakul preet starring runway 34 official trailer out | एक विमान आणि ब्लाइंड लँडिंग..., अजय देवगणच्या ‘Runway 34’ चा ट्रेलर पाहिलात का?

एक विमान आणि ब्लाइंड लँडिंग..., अजय देवगणच्या ‘Runway 34’ चा ट्रेलर पाहिलात का?

googlenewsNext

Runway 34 trailer:  अजय देवगण (Ajay Devgn) , अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुल प्रीत सिंग  (Rakul Preet Singh) स्टारर ‘रनवे 34’ (Runway 34)या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. येत्या 29 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाये. ट्रेलर पाहताना अंगावर काटा येतो. 

अजय देवगणच्या फ्लाईट प्रवासाने ट्रेलरची सुरुवात  होते आणि त्याच्या वॉकआउटने ट्रेलरची सांगता होते. ट्रेलरमध्ये अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह दोघे पायलटच्या सीटवर बसून एकत्र विमान उडवताना दिसतात. अचानक खराब हवामानामुळे त्यांच्या विमानाचा तोल बिघडतो आणि ते अत्यंत वाईट कठीण परिस्थितीत त्यांना विमान उतरवावं लागतं.

 ‘रनवे 34’ची कथा जेट एअरवेजच्या दोहा-कोच्ची फ्लाईटमधील सत्यघटनेवर आधारित आहे. 2015 साली खराब हवामान आणि अगदी कमी दृश्यमानता असताना पायलटने जोखित पत्करत हे विमान विमानतळावर उतरवलं होतं. अशा लँडिंगला ब्लाइंड लँडिंग म्हणतात. या लँडिंगमध्ये सुमारे 150 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. चित्रपटात कॅप्टन विक्रांत खन्नाची हृदयद्रावक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  को-पायलटची भूमिका अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साकारली आहे.  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  , बोमन इराणी, अंगिरा धर, आकांक्षा सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने अजयने सहा वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन केलंय. 2016 मध्ये त्याने ‘शिवाय’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.   हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: amitabh bachchan ajay devgn rakul preet starring runway 34 official trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.