‘नमस्ते इंग्लंड’ मध्ये अक्षय-सोनाक्षीचा रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 10:08 IST2016-05-04T04:38:10+5:302016-05-04T10:08:10+5:30

दोन दिवसांपूर्वी कळाले होते की, सोनाक्षी सिन्हा-सिद्धार्थ मल्होत्रा हे १९६९ मधील मर्डर मिस्ट्री असलेल्या ‘इत्तेफाक’च्या रिमेकमध्ये   दिसणार आहेत. ...

Akshay-Sonakshi Romance in 'Namaste England'! | ‘नमस्ते इंग्लंड’ मध्ये अक्षय-सोनाक्षीचा रोमान्स!

‘नमस्ते इंग्लंड’ मध्ये अक्षय-सोनाक्षीचा रोमान्स!

न दिवसांपूर्वी कळाले होते की, सोनाक्षी सिन्हा-सिद्धार्थ मल्होत्रा हे १९६९ मधील मर्डर मिस्ट्री असलेल्या ‘इत्तेफाक’च्या रिमेकमध्ये   दिसणार आहेत. मात्र, आता ती विपुल शाह यांच्या ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

चित्रपटाचे शूटिंग आॅगस्ट महिन्यात सुरू होणार असून सोनाक्षी याअगोदर कधीही दिसली नव्हती अशा अवतारात दिसणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट ‘नमस्ते लंडन’ चा सिक्वेल नसणार आहे. ज्यात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांनी काम केले होते.

हा पूर्णपणे वेगळा विषय आणि कथानकावर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाचे शूटिंग इंग्लंड, पॅरिस, स्वित्झर्लंड, ब्रुसेल्स आणि पंजाब मध्ये शूट करण्यात येईल. चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग होण्यास सहा महिने तरी लागतीलच.

पण, आता अक्षय-सोनाक्षी यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आवडीच्या जोडीला पाहण्याची संधी मिळणार आहे. राऊडी राठोड, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा, जोकर आणि हॉलीडे या चित्रपटांनंतर आता त्यांचा हा चित्रपट रिलीज होईल.

Web Title: Akshay-Sonakshi Romance in 'Namaste England'!