Raja Shivaji: स्वप्न प्रत्यक्षात उतरलं! 'राजा शिवाजी'चा ट्रेलर पाहून सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव, रितेशचं केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 14:41 IST2026-04-23T14:41:03+5:302026-04-23T14:41:32+5:30

‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलरला सध्या चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रितेश विलासराव देशमुखच्या या चित्रपटाला आणि ट्रेलरला सिनेसृष्टीतील मान्यवरांनी कौतिकाची थाप दिली आहे.

akshay kumar karan johar sonali bendre praised Raja Shivaji traier and congratulate riteish deshmukh | Raja Shivaji: स्वप्न प्रत्यक्षात उतरलं! 'राजा शिवाजी'चा ट्रेलर पाहून सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव, रितेशचं केलं अभिनंदन

Raja Shivaji: स्वप्न प्रत्यक्षात उतरलं! 'राजा शिवाजी'चा ट्रेलर पाहून सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव, रितेशचं केलं अभिनंदन

‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलरला सध्या चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २० एप्रिल रोजी हा ट्रेलर प्रदर्शित झाला. तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक दिग्गजांनी याचं कौतुक केलंय. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या रितेश विलासराव देशमुखच्या या चित्रपटाला आणि ट्रेलरला सिनेसृष्टीतील मान्यवरांनी कौतिकाची थाप दिली आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनीही या अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाचे भरभरून कौतुक केले आहे. अभिनेता अक्षय कुमार, निर्माता करण जोहर, दिग्दर्शक नागराज मंजुळे ते आदित्य सरपोतदार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्रेलरबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत चित्रपटाच्या भव्यतेचे आणि आशयाचे कौतुक केले आहे. ‘राजा शिवाजी’च्या या दमदार ट्रेलरबद्दल नेमके हे दिग्गज काय म्हणाले, याकडे सध्या चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.

अभिनेता अक्षय कुमार लिहितो, “माझा मित्र रितेश याला ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातील अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीसाठी मनापासून दाद (shoutout)! ही कथा आपल्या इतिहासात अत्यंत खोलवर रुजलेली आहे. असे स्वप्न पाहण्यासाठी प्रचंड ध्यास लागतो आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तर त्याहूनही अधिक जिद्द लागते. सुंडी... तुला केवळ आणि केवळ ‘ब्लॉकबस्टर’ यशाच्याच शुभेच्छा!”

चित्रपट निर्माता करण जोहर लिहितात, “अप्रतिम!!!!! रितेश आणि जिनिलीया”, याशिवाय चित्रपट निर्माता नागराज मंजुळेंनी ट्रेलर पाहून लिहिलंय की, “मनापासून अभिनंदन!! भारी!!”. सध्या मराठी आणि बॉलिवूडमध्ये गाजवणारा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लिहितो, “वर्षानुवर्षांचा ध्यास. आयुष्यभर जपलेले एक स्वप्न. रितेश, हे स्वप्न अखेर तू प्रत्यक्षात उतरवताना पाहून मला खूप आनंद झाला आहे. आपले महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटाला खरोखरच अशा भव्यतेची आणि अशा व्यापक दृष्टीकोनाची गरज होती. हा ट्रेलर अत्यंत प्रभावी आहे आणि प्रत्येक अर्थाने भव्य दिसत आहे. हा चित्रपट खरोखरच खूप खास आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन!”

बॉलिवूडचे महान दिग्दर्शक सुभाष घई लिहितात, “कल्पना करा, जर ट्रेलर इतका जबरदस्त असेल, तर चित्रपट कसा असेल! चित्रपटगृहांमध्ये एक केवळ जादुई अनुभव... हेच आहे. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख याने बनवलेला आणि ज्योती देशपांडे यांनी ‘जिओ’साठी निर्मित केलेला हा चित्रपट... अत्यंत उत्कटतेने आणि पूर्णपणे राष्ट्रभक्तीच्या ऊर्जेने भारलेला आहे. मला ते स्पष्टपणे दिसून येत आहे. हा चित्रपट उत्कृष्ट ठरावा यासाठी संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी मनापासून पाठिंबा दिला आहे. हा चित्रपट लवकरच पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.”

दिग्दर्शक कुकी गुलाटी लिहितात, “हे खरोखरच अविश्वसनीय आहे!! ब्लॉकबस्टर!!”, याशिवाय दिग्दर्शक मिलाप झवेरी लिहितात, “१ मे रोजी, हा चित्रपट संपूर्ण जगभरात ‘महा-ब्लॉकबस्टर’ ठरेल.”. अभिनेता सोनू सूदनेही चित्रपटाबद्दल कौतुक करताना लिहिलंय की, “माझा भाऊ रितेश याला प्रचंड यशासाठी शुभेच्छा. हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल, भावा. यातील प्रत्येक फ्रेममध्ये तुझे समर्पण आणि कठोर परिश्रम दिसून येतात.”

अभिनेत्री सोनाली बेंद्रे लिहिते, “अभिनंदन जिनिलीया, रितेश आणि संपूर्ण टीमचे. ट्रेलर अप्रतिम दिसत आहे! हा चित्रपट साकारण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली आहे हे माहीत असल्यामुळे, हा अनुभव आणखीच विशेष वाटतो! तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!”. 

याशिवाय मराठी कलाकारांनीही ट्रेलर पाहून चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधव लिहितो, “हर हर महादेव”, गायक अभिजीत सावंतने “व्वा!!!! जय हो!”,  म्हणत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी “अभिमान... प्रेम.” असं म्हणत रितेशचं कौतुक केलं आहे.

अभिनेत्री प्रिया बापट चित्रपटाबद्दल लांबलचक पोस्ट लिहून म्हटलंय की, “रितेश, मी तुम्हाला नेहमीच एक उत्कृष्ट अभिनेता, एक खरोखरच व्यावसायिक कलाकार आणि कथा सांगण्याची मनापासून आवड असलेला एक संवेदनशील कथाकार म्हणून ओळखले आहे. तुमच्या दृष्टिकोनातून साकारलेली, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची ती अद्भुत गाथा पाहण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. आणि जिनिलिया, प्रेरणादायी कथा आणि चित्रपटांना नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मोठ्या पडद्यावर तुमची ती जादुई उपस्थिती पाहण्यासाठी मी आतुर आहे. तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा... १ मे पासून चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

'राजा शिवाजी' या चित्रपटात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार झळकणार आहेत. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांचा समावेश आहे; तर या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशा सर्व जबाबदाऱ्या रितेश विलासराव देशमुखने समर्थपणे सांभाळल्या आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि त्यांच्या महान वारशावर आधारित असलेला हा ऐतिहासिक महाकाव्यपट, १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Web Title : राजा शिवाजी ट्रेलर: सितारों ने रितेश देशमुख की ऐतिहासिक फिल्म की प्रशंसा की।

Web Summary : राजा शिवाजी के ट्रेलर को बॉलीवुड और मराठी सिनेमा से सराहना मिली। अक्षय कुमार और करण जौहर जैसे सितारों ने रितेश देशमुख की दूरदृष्टि और समर्पण की सराहना की। फिल्म 1 मई, 2026 को रिलीज होगी।

Web Title : Raja Shivaji trailer: Celebrities praise Ritesh Deshmukh's historical epic.

Web Summary : Raja Shivaji's trailer receives acclaim from Bollywood and Marathi cinema. Celebrities like Akshay Kumar and Karan Johar lauded Ritesh Deshmukh's vision and dedication. The film releases May 1st, 2026.