अक्षय कुमारचा 'भूत बंगला' थिएटरनंतर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, अपडेट आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:56 IST2026-04-17T12:49:16+5:302026-04-17T12:56:24+5:30
'भूत बंगला" हा २०२६ मधील बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे.

अक्षय कुमारचा 'भूत बंगला' थिएटरनंतर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, अपडेट आली समोर
'भूत बंगला' (Bhooth Bangla) हा २०२६ मधील बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आणि दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी तब्बल १४ वर्षांनंतर या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आली आहे. हा चित्रपट अधिकृतपणे आज १७ एप्रिल २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे, ज्याचे पेड प्रिव्ह्यू (Paid Previews) १६ एप्रिल २०२६ च्या रात्री ९ वाजल्यापासून सुरू झाले होते. दरम्यान, हा चित्रपट थिएटरमधील प्रदर्शनानंतर कोणत्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर येईल, याबाबतचा खुलासा झाला आहे.
जेव्हा एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा त्याच्या डिजिटल स्ट्रीमिंगबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. 'भूत बंगला'च्या बाबतीतही अशीच अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग हक्क लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) कडे आहेत. नेटफ्लिक्स या चित्रपटाचा अधिकृत डिजिटल पार्टनर असून, थिएटरनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल.
चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सध्याच्या ट्रेंडनुसार, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून साधारण ४ ते ६ आठवड्यांनी ओटीटीवर येतो. यानुसार, 'भूत बंगला' जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर पाहायला मिळू शकतो.