'सिंघम 3' च्या शूटिंग सेटवर अजय देवगणला दुखापत; रोहित शेट्टीने चित्रपटाचे शूटिंगही थांबवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 04:18 PM2023-12-24T16:18:00+5:302023-12-24T16:20:57+5:30

'सिंघम अगेन' सिनेमाच्या सेटवर अजय देवगनला दुखापत झाली आहे.

Ajay Devgn injured on the shooting sets of 'Singham 3'; Rohit Shetty also stopped the shooting of the film | 'सिंघम 3' च्या शूटिंग सेटवर अजय देवगणला दुखापत; रोहित शेट्टीने चित्रपटाचे शूटिंगही थांबवलं

'सिंघम 3' च्या शूटिंग सेटवर अजय देवगणला दुखापत; रोहित शेट्टीने चित्रपटाचे शूटिंगही थांबवलं

अभिनेता अजय देवगन सध्या 'सिंघम अगेन' सिनेमामुळे चर्चेत आहे.  या चित्रपटात अजय देवगन आपल्या डॅशिंग स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. पण, सिनेमाबाबत एक अपडेट समोर आलं आहे. सिंघम 3 च्या सिनेमाचं थांबवण्यात आलं आहे. कारण, सिनेमाच्या सेटवर अजय देवगनला दुखापत झाली आहे.

सिंघम 3'च्या सेटवर अजय देवगनच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. डोळ्याला दुखापत झाल्याने त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागल्याची माहिती आहे.  अजयच्या सीनच्या 'सिंघम 3'चं शुटिंगच्या तारखा डिसेंबरमध्ये शेड्युल करण्यात आल्या होत्या.

आता अजय जखमी झाल्याने उर्वरित शुटिंग हैदराबादमध्ये 2024 मध्ये सुरू होईल.  2023 मध्ये हा सिनेमाचं शूटिंग होणार नाही. कारण, अजय देवगन शिवाय 'सिंघम 3'चं शूटिंग पूर्ण होणं अशक्य आहे. तो या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

'सिंघम 1' आणि 'सिंघम 2' नंतर आता 'सिंघम 3' रोहित शेट्टी प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अजय देवगन हा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. अजय देवगनसह करिना कपूर खान आणि दीपिका पादुकोणलाही कास्ट केलं आहे. त्याशिवाय सोनू सूद, प्रकाश राज, फरदीन खान, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंह आणि आपला सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधवदेखील सिनेमात भूमिका साकारणार आहे. आधीच्या दोन पार्टप्रमाणेच आता तिसरा पार्टदेखील धमाकेदार असेल असं बोललं जात आहे. 

Web Title: Ajay Devgn injured on the shooting sets of 'Singham 3'; Rohit Shetty also stopped the shooting of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.