५६ वर्षांच्या व्यक्तीचा ३५ वर्षांच्या तरुणीवर जडतो जीव! ओटीटीवर 'या' प्रेमकथेला मिळतेय पसंती; तुम्ही बघितला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:09 IST2026-01-22T17:07:17+5:302026-01-22T17:09:10+5:30
५६ वर्षांचा नायक अन् ३५ वर्षांची नायिकेचा ऑनस्क्रिन रोमान्स,'या' रोमॅन्टिक सिनेमानं जिंकली मनं, OTTवर आहे ट्रेंडिंग

५६ वर्षांच्या व्यक्तीचा ३५ वर्षांच्या तरुणीवर जडतो जीव! ओटीटीवर 'या' प्रेमकथेला मिळतेय पसंती; तुम्ही बघितला?
Ott Trending Movie: अलिकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं एक नवं द्वार खुलं झालं आहे. या डिजीटल प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षक आता घरबसल्या सिनेमे असो वा सीरिज पाहणं पसंत करतात. अगदीच हॉरर असो किंवा रोमॅन्टिक प्रत्येक जॉनरच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. बऱ्याचदा असंही होतं की, थिएटरमध्ये फारशी चांगली काम न करु शकलेले सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होताच लोकप्रिय ठरतात.
अशाच एका सिनेमाची सध्या ओटीटीवर चर्चा रंगली आहे. आगळंवेगळं कथानक असलेल्या या रोमॅन्टिक चित्रपटाला आता ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. २०२५ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात ५६ वर्षांचा नायक आणि ३५ वर्षांच्या नायिकेची केमिस्ट्री पाहायला मिळाली. २ तास २६ मिनिटांचा हा रोमॅन्टिक ड्रामा ओटीटीवर रिलीज होताच ट्रेंडिंगमध्ये आहे. या चित्रपटाचं नाव म्हणजे 'दे दे प्यार दे-२' आहे. 'Ormax StreamView' च्या रिपोर्टनुसार ओटीटीवर चित्रपटांच्या कॅटेगरीमध्ये हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तुम्ही बघू शकता.
कथानक
या चित्रपटात अजय देवगण एका तरुणीच्या प्रेमात पडतो, असं दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर ही तरुणी त्याची आपल्या कुटुंबियांसोबत भेट घडवून आणते. त्यानंतर खऱ्या अर्थाने कथेला सुरुवात होते.
'दे दे प्यार दे-२' सिनेमाचं दिग्दर्शन अंशुल शर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण, रकुल प्रीत सिंग, आर. माधवन आणि गौतमी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय चित्रपटात जावेद जाफरी आणि मीझान जाफरी देखील आहेत. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.