​आयुष्यमानने परिणीतीला दिला मोलाचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 21:33 IST2016-08-04T16:03:46+5:302016-08-04T21:33:46+5:30

परिणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराणा हे दोघेही सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’मध्ये बिझी आहे. चित्रपटाच्या सेटवर आयुष्यमान आणि परिणीतीचे चांगलेच ...

Advice to give life to life! | ​आयुष्यमानने परिणीतीला दिला मोलाचा सल्ला!

​आयुष्यमानने परिणीतीला दिला मोलाचा सल्ला!

िणीती चोप्रा आणि आयुष्यमान खुराणा हे दोघेही सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’मध्ये बिझी आहे. चित्रपटाच्या सेटवर आयुष्यमान आणि परिणीतीचे चांगलेच सूर जुळलेत. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. परिणीती आणि आयुष्यमान दोघांनाही गाण्याची आवड आहे. मग काय, सेटवरचा फावला वेळ दोघेही गाणे गुणगुण्यात घालवतात. यातूनच आयुष्यमानने परिणीतीला एक सल्ला दिला आहे. होय, परिणीतीकडे गोड गळा आहे आणि म्हणूनच संगीतातील करिअरचा परिणीतीने गांभियार्ने विचार करायला हवा असा सल्ला  आयुषमानने तिला दिला आहे. आयुषमान स्वत: उत्तम पार्श्वगायक आहे. त्याने अनेक चित्रपटांत गाणी देखील गायली आहेत, इतकेच नाही तर अभिनयापेक्षा त्याचा आवाजाला प्रेक्षकांनी अधिक दाद दिली आहे. या अभिनेत्याने परिणीतीची स्तुती करताना तिच्या गायनाचे कौतुक केले आहे. परिणीतीचा आवाज हा फारच सुंदर असून तिने याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे इतकेच नाही तर अभियापेक्षा तिने गाण्यात करिअर घडवले पाहिजे असा सल्ला त्याने दिला आहे. 

Web Title: Advice to give life to life!