अभिनेत्रीची आजीही लय भारी Drunk N High डान्सने वेधले लक्ष, तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 13:24 IST2021-02-18T13:23:59+5:302021-02-18T13:24:30+5:30

या व्हिडीओमध्ये अदापेक्षा आजीनेच चाहत्यांचे मनं जिंकली आहेत. व्हिडीओ शेअर होताच अवघ्या काही तासाच तो व्हायरल झाला आणि आत्तापर्यंत लाखों लोकांनी तो पाहिलाय.

Adah Sharma And Her Grandmother Drunk And Highe Dance Video Viral | अभिनेत्रीची आजीही लय भारी Drunk N High डान्सने वेधले लक्ष, तुम्ही पाहिला का?

अभिनेत्रीची आजीही लय भारी Drunk N High डान्सने वेधले लक्ष, तुम्ही पाहिला का?

अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास अनेक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतील. लॉकडाऊनदरम्यान अदाने एक से बढकर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले होते.

 

तेव्हापासून तिने व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटाच लावल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर तिने आजीलाही तिच्यासह थिरकायला भाग पाडले आहे. अदाने तिच्या आजीसोबत डान्स करतानाचा एख व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अदापेक्षा आजीनेच चाहत्यांचे मनं जिंकली आहेत. व्हिडीओ शेअर होताच अवघ्या काही तासाच तो व्हायरल झाला आणि आत्तापर्यंत लाखों लोकांनी तो पाहिलाय.

अदा शर्माच्या स्टाइलमध्ये आता मास्कचीही एंट्री झाली आहे. अनोख्या पद्धतीच्या मास्कनेच लक्ष वेधून घेतले आहे. अदा शर्माची प्रत्येक अदा चाहत्यांना वेड लावते. मात्र या लुकमध्ये तिच्या या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहेत.आजकाल फॅन्सी मास्कचा ट्रेंड प्रचंड सुरू आहे. अशा परिस्थितीत अदा शर्माची ही मास्क क्रिएटीव्हीटी चाहत्यांना प्रभावित करू शकते. फोटोत दिसतअसल्याप्रमाणे अदा रेड आउटफिटमध्ये दिसत आहे. हातात एक टेडी मांजरही दिसत आहे. 2008मध्ये अदाने 1920 सिनेमामधून पदार्पण केले होते. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या आहेत. 'कमांडो-२' या सिनेमातही अदा झळकली होती .


मध्यंतरी माकडांसोबतही गप्पा मारतानाच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ती माकडांसोबत इंग्रजीमध्ये बोलत होती. हे पाहून अनेकांना हसू आवरले नाही. म्हणून नेटीझन्सने तिला चांगलेच ट्रोल केले होते. इतकेच नाही तर यापूर्वीही तिने भींतीला लटकत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. विस्कटलेले केस, भिंतीवर लटकलेली अदाला पाहून अनेकांनी तिने असे का केले असावे असा प्रश्न निर्माण झाला होता.

Web Title: Adah Sharma And Her Grandmother Drunk And Highe Dance Video Viral