प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लक्ष्मीचं आगमन, अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:52 IST2026-04-19T12:52:00+5:302026-04-19T12:52:25+5:30

प्रसिद्ध दिग्दर्शक झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

actress shivalika oberoi welcomes baby girl on auspecious day of akshaya tritiya her husband director abhishek pathak became father | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लक्ष्मीचं आगमन, अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी दिला बाळाला जन्म

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लक्ष्मीचं आगमन, अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी दिला बाळाला जन्म

'दृश्यम'फेम दिग्दर्शक अभिषेक पाठक बाबा झाला आहे. पत्नी आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयने आज अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लक्ष्मीच्या आगमनाने पाठक आणि ओबेरॉय कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. शिवालिका आणि अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

शिवालिका आणि अभिषेक या कपलने सोशल मीडियावर लिहिले, "आजच्या शुभमुहुर्तावर आमच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. आजच्या दिवशी आम्हाला मिळालेला हा सर्वात सुंदर आशीर्वाद आहे." तसंच त्यांनी फोटो शेअर करत लिहिले, "अचानक आमच्या आयुष्याला नवीन अर्थ मिळाला आहे. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाने आज १९ एप्रिल २०१६ रोजी आम्ही मुलीचं स्वागत करत आहोत."


२०२३ साली अभिषेक आणि शिवालिका लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. २०२० साली शिवालिकाने 'खुदा हाफिज'सिनेमात काम केले होते. या सिनेमाची निर्मिती अभिषेकनेच केली होती. अभिषेक पाठक पॅनोरमा स्टुडिओजचे संस्थापक कुमार मंगत पाठक यांचा मुलगा आहे. अभिषेकनेही पॅनोरमा स्टुडिओ अंतर्गत मराठी सिनेमांचीही निर्मिती केली आहे. यामध्ये मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा नुकताच रिलीज झालेला 'फुलवंती'ही आहे. तसंच 'घरत गणपती' सिनेमाही त्यांनीच निर्मित केला आहे.

Web Title : अक्षय तृतीया पर अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय और अभिषेक पाठक को बेटी का आशीर्वाद

Web Summary : निर्देशक अभिषेक पाठक और अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय ने अक्षय तृतीया पर एक बेटी का स्वागत किया। दंपति ने सोशल मीडिया के माध्यम से अपनी बेटी के आगमन की घोषणा की, अपनी खुशी और आभार व्यक्त किया। उन्होंने 2023 में शादी की। अभिषेक ने शिवालिका की फिल्म 'खुदा हाफिज' का निर्माण किया और मराठी फिल्मों का निर्माण किया है।

Web Title : Actress Shivaleeka Oberoi, Abhishek Pathak blessed with baby girl

Web Summary : Director Abhishek Pathak and actress Shivaleeka Oberoi welcomed a baby girl on Akshaya Tritiya. The couple announced the arrival of their daughter via social media, expressing their joy and gratitude. They married in 2023. Abhishek produced Shivaleeka's film 'Khuda Haafiz' and has produced Marathi films.