'माझी तुलना कुत्र्यासोबत झाली'; ट्रोलिंगविषयी बोलताना आयुष शर्मा भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 03:46 PM2024-04-25T15:46:02+5:302024-04-25T15:46:43+5:30

Aayush sharma: सलमान खानच्या कुत्र्यासोबत झाली आयुषची तुलना, ६ वर्षानंतर पहिल्यांदाच आयुषने केलं ट्रोलिंगवर भाष्य

aayush-sharma-tears-up-as-he-recalls-a-cruel-troll-compared-him-to-dog-says-when-my-son-will-read-about-this | 'माझी तुलना कुत्र्यासोबत झाली'; ट्रोलिंगविषयी बोलताना आयुष शर्मा भावुक

'माझी तुलना कुत्र्यासोबत झाली'; ट्रोलिंगविषयी बोलताना आयुष शर्मा भावुक

बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा (salman khan) मेहुणा आयुष शर्मा (ayush sharma) लवकरच रुसलान या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे आयुष सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अलिकडेच आयुषने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ट्रोलिंगवर भाष्य केलं. 'लवयात्री' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या आयुषला लोकांनी पहिल्याच सिनेमाच्या वेळी प्रचंड ट्रोल केलं. अगदी सलमान खानच्या कुत्र्यासोबतही त्याची तुलना केली. या सगळ्या ट्रोलिंगवर जवळपास ६-७ वर्षांनी त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

'सलमान खानने आयुषला लॉन्च करण्याऐवजी त्याच्या कुत्र्याला लॉन्च करायला पाहिजे होतं', अशा खालच्या पातळीवर जाऊन लोकांनी त्याला ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर त्याने अलिकडेच भाष्य केलं. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो पहिल्यांदाच यावर व्यक्त झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलत असतांना त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

माझी तुलना कुत्र्यासोबत केली

"त्या एका दिवसानंतर माझं आयुष्य  बदलून गेलं. त्या दिवसामुळेच आज मी इथे उभा आहे. मी आतापर्यंत बरंच काही सहन केलं. मात्र, माझी तुलना एका कुत्र्यासोबत केली जात होती हे मला सहन झालं नाही. माझ्या मुलाने जर माझ्याविषयी इंटरनेटवर काही सर्च केलं तर, 'याचा बाप कुत्रा आहे', अशी कमेंट त्याला दिसू नये. जेव्हा माझी मूलं माझ्याविषयी काही सर्च करतील तर त्यांना माझ्याविषयी चांगल्याच बातम्या मिळाव्यात. त्यांना माझा अभिमान वाटला पाहिजे. एका मोठ्या पोर्टलने लिहिलं होतं की, 'आयुष शर्मा एक कुत्रा आहे", असं म्हणत आयुषने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

'लोकांना वाटतं मला डोकं नाहीये, पण...' इंडस्ट्रीत मिळालेल्या वागणुकीवर आयुष शर्माने पहिल्यांदाच केलं भाष्य

पुढे तो म्हणतो, मी त्या सगळ्या ट्रोलर्सचे आभार मानतो. कारण, माझ्या करिअरला घडवण्यासाठी त्यांचीही मदत झाली. दरम्यान, आयुषने लवयात्री, अंतिम या सिनेमांमध्ये झळकला आहे. तसंच मांझास पहली पहली बारिश, चुम्मा चुम्मा आणि तेरा होके नचदा फिरा यांसारख्या म्युझिक अल्बममध्येही तो झळकला आहे. लवकरच तो रुसलान या सिनेमात मुख्य भूमिका साकारतांना दिसणार आहे.

Web Title: aayush-sharma-tears-up-as-he-recalls-a-cruel-troll-compared-him-to-dog-says-when-my-son-will-read-about-this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.