आमिर खान अन् गौरी स्प्रॅटच्या नात्यावर जुनैद खानची प्रतिक्रिया, वडिलांच्या आधीच्या लग्नांबद्दल म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:02 IST2026-05-13T12:52:10+5:302026-05-13T13:02:50+5:30

"प्रत्येकाची मतं...",आई-वडिलांच्या घटस्फोटावर जुनैद खान पहिल्यांदाच बोलला, गौरी स्प्रॅटबद्दल काय म्हणाला?

aamir khan son junaid khan talk about her bonding with father girlfriend gauri spratt and ex wife kiran rao and separation of his parents | आमिर खान अन् गौरी स्प्रॅटच्या नात्यावर जुनैद खानची प्रतिक्रिया, वडिलांच्या आधीच्या लग्नांबद्दल म्हणाला...

आमिर खान अन् गौरी स्प्रॅटच्या नात्यावर जुनैद खानची प्रतिक्रिया, वडिलांच्या आधीच्या लग्नांबद्दल म्हणाला...

Junaid Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणूनअभिनेता आमिर खानला ओळखलं जातं. आमिर खान जेवढा त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो,तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अलिकडेच काही महिन्यांपूर्वीच आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल जाहीरपणे सांगितलं होतं. गौरी स्प्रॅट असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे. तो व गौरी अनेकदा एकत्र दिसतात. या आधी आमिर खानने दोनवेळा लग्न केलं असून दोन वेळा घटस्फोट घेतला आहे. अशातच आमिर खानचा मुलगा जुनैद खानने एका मुलाखतीत त्याने आपल्या आई वडिलांचा घटस्फोट आणि कुटुंबाबद्दल भाष्य केलं आहे. शिवाय वडिलांचं आधीचं लग्न आणि दुसरी पत्नी किरण राव यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर त्याचं नातं कसं आहे? यावर वक्तव्य केलं. शिवाय गौरी स्प्रॅटसोबतच्या बॉण्डिंगबद्दलही तो खुलेपणाने बोलला आहे.

जुनैद खान सध्या एक दिन या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने 
अलिकडेच विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीत जुनैद खानने अनेक गोष्टींवर मोकळेणाने भाष्य केलं. दरम्यान, किरण रावसोबतच्या नात्याबद्दल म्हणाला,"किरण एक खूप चांगली व्यक्ती आहे. ती नेहमीच खूप प्रेमळ आणि मायाळू आहे.आमच्यात नात्यात कधीच काही समस्या आल्या नाहीत. आम्ही कायम एकमेकांसोबत चांगले वागलो.  त्यावेळी घरातील वडीलधारी मंडळीने प्रत्येक गोष्ट खूप समजूतदारपणे हाताळली. जे काही चालू होतं त्याचा आम्हा मुलांवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. " जुनेदने पुढे स्पष्ट केलं की, त्यांच्या कुटुंबातील वातावरण नेहमीच शांत आणि सामान्य राहिलं आहे.

गौरी स्प्रॅटबद्दल जुनैद खाननं केलेल्या वक्तव्य चर्चेत

या मुलाखतीत  जुनैदने आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिचेही खूप कौतुक केलं. तो म्हणाला, "गौरी खूप गोड आहे आणि मी बाबांसाठी खूप आनंदी आहे."असं जुनैदने यावेळी सांगितलं.

पुढे आई रीना आणि वडिलांच्या घटस्फोटाबद्दल जुनैद म्हणाला, "तेव्हा मी कदाचित सात किंवा आठ वर्षांचा असेन, त्यामुळे मला सुरुवातीला काहीच कळतं नव्हतं. प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी असू शकतात, हे मला वयाच्या १९ व्या वर्षी पहिल्यांदा समजलं.माझ्या आईवडिलांनी सर्व काही खूप हुशारीने हाताळलं." 

Web Title : आमिर के रिश्तों, तलाक और गौरी स्प्रैट पर जुनैद खान ने की बात

Web Summary : जुनैद खान ने अपने माता-पिता के तलाक, किरण राव के साथ अपने बंधन और अपने पिता आमिर खान के गौरी स्प्रैट के साथ रिश्ते पर चर्चा की। उन्होंने गौरी की प्रशंसा की और परिवर्तनों को परिवार द्वारा परिपक्वता से संभालने पर जोर दिया।

Web Title : Junaid Khan speaks on Aamir's relationships, divorce, and Gauri Spratt.

Web Summary : Junaid Khan discussed his parents' divorce, his bond with Kiran Rao, and his father Aamir Khan's relationship with Gauri Spratt. He praised Gauri and emphasized the family's mature handling of transitions.