दारु पिऊन शूट झाला होता 'थ्री इडियट्स'मधील 'हा' सीन; अभिनेत्याने सांगितला शूटिंगचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:13 IST2024-03-22T15:13:05+5:302024-03-22T15:13:34+5:30

3 idiots: आमिरने आग्रह केल्यामुळे शर्मन आणि माधवन या दोघांनीही दारु प्यायली आणि सीन शूट करायचा प्रयत्न केला.

3-idiots-drunk-scene-story-r-madhavan-aamir-khan-sharman-joshi | दारु पिऊन शूट झाला होता 'थ्री इडियट्स'मधील 'हा' सीन; अभिनेत्याने सांगितला शूटिंगचा किस्सा

दारु पिऊन शूट झाला होता 'थ्री इडियट्स'मधील 'हा' सीन; अभिनेत्याने सांगितला शूटिंगचा किस्सा

बॉलिवूडच्या इतिहासात प्रचंड गाजलेला सिनेमा म्हणजे थ्री इडियट्स. आमिर खान (aamir khan), आर. माधवन (r. madhavna) आणि शर्मन जोशी (sharman joshi) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. २००९ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने त्यावेळी ४०० कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे आजही या सिनेमातील काही डायलॉग्स, सीन प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. यामध्येच या सिनेमातील एक सीन या तीनही कलाकारांनी चक्क दारु पिऊन केला होता.

थ्री इडियट्समध्ये फरहानची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवन याने अलिकडेच बायसेप्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सिनेमातील अनेक अनसीन किस्से सांगितले. यात एका सीनमध्ये तर आमिर, शर्मन आणि त्याने चक्क दारु प्यायली होती. विशेष म्हणजे या सिनेमध्ये दारु पिण्यामागे एक खास कारण होतं. इतकंच नाहीत आमिर खानने दारु पिण्यासाठी फोर्स केलं होतं, असंही माधवनने सांगितलं.

नेमका काय आहे दारु पिण्यामागचा किस्सा

या सिनेमामध्ये राजू, फरहान आणि रँचो यांचा एक सीन आहे. या सीनमध्ये ते प्राध्याकांच्या घरी जातात आणि त्यांच्या दरवाजावर लघुशंका करतात. या सीनमध्ये तिघेही मद्यधुंद अवस्थेमध्ये दाखवले आहेत. मात्र, या तिघांनी खरोखरच हा सीन शूट करतांना दारु प्यायली होती.

काय म्हणाला माधवन?

हो या सीनमध्ये आम्ही खरोखरच दारु प्यायलो होतो. ही आमिरची कल्पना होती. दारु प्यायल्याचा अभिनय कधीच करु नका. तर खरंच दारु प्या आणि त्या अवस्थेत नॉर्मल असल्यासारखं वागा, असं आमिरचं मत होतं. आमचं शूट रात्री ९ वाजताचं होतं. आणि आमिरने आम्हाला रात्री ८ वाजल्यापासून दारु पाजायला सुरुवात केली, असं माधवन म्हणाला.

पुढे तो म्हणतो, दारु प्यायल्यानंतर आम्ही तो सीन शूट करायला सुरुवात केली. हा सीन शूट करायला आम्हाला बराच वेळ लागला. खूप उशीर झाला होता. मात्र, त्यानंतरही आम्ही तिघांनीही आमचे संवाद पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन तास लावले”.
दरम्यान, या सिनेमात आमिर खान, आर माधवन व शर्मन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. यांच्यासोबतच बोमन इराणी, करीना कपूर,ओमी वैद्य, मोना सिंह या कलाकारांनीही स्क्रीन शेअर केली होती.

Web Title: 3-idiots-drunk-scene-story-r-madhavan-aamir-khan-sharman-joshi