कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:29 IST2025-06-09T09:28:40+5:302025-06-09T09:29:07+5:30

अभिनेत्रीला झालाय 'हा' गंभीर आजार

bigg boss ott winner sana makbul admitted to the hospital after celebrating eid with family | कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री

कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री

'बिग बॉस ओटीटी ३'ची विजेती सना मकबूल (Sana Makbul) रुग्णालयात दाखल झाली आहे. यकृताच्या गंभीर आजाराने ती त्रस्त आहे. नुकतेच तिने कुटुंबासोबत ईद साजरी करतानाचे फोटो पोस्ट केले होते. तिची मैत्रीण डॉ आशना कांचवालाने सनाचा रुग्णालयातील बेडवर असलेला फोटो शेअर केला आहे. तसंच सना लवकरात लवकर बरी होऊ दे अशी प्रार्थना केली आहे. सनाला नक्की झालं काय?

डॉ आशनाने सनाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये सना अगदीच कमजोर झाल्याचं दिसत आहे. आशना लिहिले, "माझी सर्वात स्ट्राँग डीवा...तू इतक्या हिंमतीने आणि धैर्याने या गंभीर आजाराचा सामना करत आहेस. मला तुझ्यावर गर्व आहे. तू यातून आणखी स्ट्राँग होऊन बाहेर येथील. देव तुझ्यासोबत आहे आणि मी तुझ्यासाठी कायम उभी आहे. लवकरच बरी हो माझी जान सना."

सना मकबूल काही वर्षांपासून ऑटोइम्यून हिपॅटायटीस आजाराचा सामना करत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने याचा खुलासा केला होता.  'ऑटोइम्यून हिपॅटायटीस' हा एक यकृताचा गंभीर आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही यकृतावर हल्ला करते, ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवतात. सनाला २०२० मध्ये हा आजार आपल्याला झाल्याचं तिला कळालं होतं. आताही सना याच कारणामुळे रुग्णालयात दाखल झाल्याचा अनेकांचा अंदाज आहे. 

याआधी भारती सिंगला दिलेल्या मुलाखतीत सना म्हणाली होती की, ""या आजाराशी लढण्यासाठी अनेक औषधांची मदत घ्यावी लागते. मी स्टिरॉइड्स आणि इम्यूनोसप्रेसेन्ट्स घेते. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, की नाही याबद्दल डॉक्टरांचे मत स्पष्ट नाही.  माझी तब्येत सतत बदलत राहते, कधीकधी मला बरं वाटतं तर कधीकधी मला खूप अशक्तपणा जाणवतो."

सना या आजारामुळे पूर्णत: शाकाहारी झाली आहे.बिग बॉस जिंकल्यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे. अलिकडेच तिनं 'बिग बॉस १८'चा विजेता करणवीर मेहरासोबत एक म्युझिक व्हिडिओ केला होता. 

Web Title: bigg boss ott winner sana makbul admitted to the hospital after celebrating eid with family