सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:52 IST2024-10-18T12:51:12+5:302024-10-18T12:52:09+5:30

गौतमी पाटील हिने सूरजबरोबरच्या भेटीचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan Met Gautami Patil Video Viral | सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहिलात का?

सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहिलात का?

महाराष्ट्रात सध्या रील स्टार आणि 'बिग बॉस मराठी' फेम सुरज चव्हाणची चर्चा आहे. पण, यासोबत आणखी एक नाव महाराष्ट्रात कायम लक्ष वेधून घेतं ते म्हणजे गोतमी पाटील. आता या दोन्ही लोकप्रिय व्यक्तींची भेट झाली आहे.  गौतमी पाटील हिने 'गुलीगत किंग'ची भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

गौतमी पाटील हिने सूरजबरोबरच्या भेटीचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये गौतमी आणि सूरज हे मेकअप रूपमध्ये असून एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. गौतमीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'बिग बॉस विजेता'. गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


सूरजचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रोत्साहन मिळत आहे.  मोठा संघर्ष करून सूरज चव्हाणने आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्याचा 'राजा राणी'  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण महत्त्वाचा भूमिकेत आहे. शिवाय,  केदार शिंदेंनी देखील सूरजसाठी नव्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाची घोषणा केली आहे.
 

Web Title: Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan Met Gautami Patil Video Viral