"इथं राहायचं असेल तर…", मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षाचालकांवर 'बिग बॉस' फेम विशाल कोटियन भडकला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:39 IST2026-04-25T13:35:48+5:302026-04-25T13:39:03+5:30

"महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी शिका…",रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, निर्णयाबद्दल'बिग बॉस' फेम विशाल कोटियन स्पष्टच बोलला

bigg boss marathi season 6 contestant vishal kotian reaction on marathi compulsion for auto taxi drivers | "इथं राहायचं असेल तर…", मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षाचालकांवर 'बिग बॉस' फेम विशाल कोटियन भडकला 

"इथं राहायचं असेल तर…", मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षाचालकांवर 'बिग बॉस' फेम विशाल कोटियन भडकला 

Vishal Kotian On Marathi Compulsory Issue:  महाराष्ट्रात परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याच्या निर्णायामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे की, ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांचे परवाने रद्द केले जातील. या नियमाविरोधात महाराष्ट्रातील ऑटो आणि टॅक्सी चालकांनी ४ मे पासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाच्या नवीन नियमांनुसार, मराठी भाषेच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांचे परवाने आणि परवानगी रद्द केले जाऊ शकतात. यामुळे महाराष्ट्रातील ऑटो आणि टॅक्सी चालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकरणावर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच यावर बिग बॉस फेम विशाल कोटियनने प्रतिक्रिया दिली आहे.

'बिग बॉस मराठी'च्या ६ व्या पर्वातून विशाल कोटियन हे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं.त्याच्या गेमचं वेळोवेळी कौतुक झालं. मात्र, फानलपर्यंत मजल मारूनही त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. 'बिग बॉस' मराठी संपल्यानंतर विशाल वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे. 

विशाल कोटियन काय म्हणाला?

नुकतीच विशाल कोटियने 'नवशक्ती'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला सध्याच्या रिक्षाचालकांवरील मराठी भाषा सक्तीच्या वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विशाल म्हणाला," माझा जन्म महाराष्ट्रातच झाला आहे. मी जन्माने,कर्माने आणि मनानेही मराठी आहे. याआधी मी काही मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे.मध्ये कुठेतरी हिंदीत काम करत असताना मराठी बोलायची सवय सुटली होती. पण, आता बिग बॉसमुळे मला स्पष्ट मराठी बोलता येत आहे."

पुढे विशाल म्हणाला, "मराठी एक चांगली भाषा आहे. आणि मला मराठी आणि महाराष्ट्राबद्दल खूप आदर आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे. याच मताचा मी आहे. बाहेरच्या राज्यात देखील हे असंच आहे. महाराष्ट्रात राहूनही तुम्हाला मराठी येत नसेल तर शिका... इथं राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल. मी आता बिग ब़ॉसमधून बाहेर आलोय त्यामुळे मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण, हा निर्णय योग्य आहे. मराठी यायलाचं पाहिजे. मराठी बोला, कारण हा महाराष्ट्र आहे."

Web Title : विशाल कोटियन ने ऑटो चालकों के लिए मराठी का समर्थन किया, विरोध की आलोचना की।

Web Summary : बिग बॉस फेम विशाल कोटियन ने महाराष्ट्र के ऑटो चालकों के लिए अनिवार्य मराठी का समर्थन किया। उनका मानना है कि निवासियों के लिए मराठी जानना जरूरी है, नियम का विरोध करने वालों की आलोचना की। उन्होंने भाषा और राज्य के प्रति सम्मान पर जोर दिया।

Web Title : Vishal Kotian supports Marathi for auto drivers, slams opposition.

Web Summary : Big Boss fame Vishal Kotian supports compulsory Marathi for Maharashtra's auto drivers. He believes knowing Marathi is essential for residents, criticizing those opposing the rule. He emphasized respect for the language and state.