भार्गवी चिरमुलेची दुबई सफर

By Admin | Updated: March 1, 2017 02:33 IST2017-03-01T02:33:59+5:302017-03-01T02:33:59+5:30

प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. आपण ही परदेशात जावे. तेथिल पर्यटनाचा आनंद घ्यावा.

Bhargavi Chirmulechi's Dubai Tour | भार्गवी चिरमुलेची दुबई सफर

भार्गवी चिरमुलेची दुबई सफर


प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. आपण ही परदेशात जावे. तेथिल पर्यटनाचा आनंद घ्यावा. त्या देशातील संस्कृती जवळून पाहावी. त्याचबरोबर त्या देशातील प्रत्येक छोटया छोटया गोष्टीचा आनंद घ्यावा. हा आनंद आपल्या स्मरणात कायम राहावा यासाठी प्रत्येकी व्यक्ती ही झक्कास फोटोसेशन करत असते. आणि या फोटोसेशनच्या आठवणी त्या देशाच्या डायरीमध्ये उतरविते. अशीच एक आठवण अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने सोशलमीडियावर शेअर केली आहे. नुकतेच अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने दुबईची सफर केली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण तिने नुकतेच दुबईच्या वाळवंटातील अरेबी लूकमधील एक झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर ती वाळवंटात ही एकदम कूल अशा लूकमध्ये असल्याचे दिसत आहे. तिच्या या लूकला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिच्या चाहत्यांनीदेखील तिच्या सौदयार्चे कौतुक केले आहे.

Web Title: Bhargavi Chirmulechi's Dubai Tour