मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:22 IST2026-04-22T10:21:42+5:302026-04-22T10:22:34+5:30

ट्रॅक्टरवर काढला फोटो, वडाच्या पारंब्याचा केला झोका; लहानपणीच्या आठवणींना दिला उजाळा

ashwini bhave wandering on farm enjoying every bit of nature on earth day | मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक

मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक आहेत. तेथील अनेक व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. वेगवेगळ्या रेसिपी, अमेरिकेतली घराची झलक, त्यांच्या घरासमोरील गार्डन अशा गोष्टी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. त्यांनी नुकताच भारतातील गावच्या शेतातील व्हिडीओ पोस्ट केला आहे. आज Earth day निमित्त त्यांचा हा व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

अश्विनी भावे यांच्या व्हिडीओमध्ये त्या शेतात मस्त फिरत आहेत. ट्रॅक्टरवर बसल्या आहेत. गुरांना चारा घालत आहेत. शेतकऱ्यांशी, त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत आहेत, चिंचेचा आस्वाद घेत आहेत, उसाचा रस एन्जॉय एन्जॉय करत आहेत, लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत वडाच्या झाडाच्या पारंब्याला धरुन झोका घेत आहेत  अशा अनेक आठवणींची झलक त्यांनी इन्स्टाग्रामवरुन दाखवली आहे. या व्हिडीओला त्यांनी 'मन रानात गेलं गं...' हे गाणं बॅकग्राऊंडला लावलं आहे.

'पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी जिथे आयुष्य पुन्हा खऱ्या अर्थाने जगल्यासारखं वाटतंय. निसर्गाचा साधेपणा श्वासात भरून घेत, या शांततेचा अनुभव घेत आणि निसर्ग सहजरित्या जे सौंदर्य आपल्याला देतोय, त्याच्याशी पुन्हा नातं जोडत आहे.या 'वसुंधरा दिनी' ही एक छोटीशी आठवण... आपण पृथ्वीची जितकी काळजी घेऊ, तितकीच ती आपल्याला भरभरून देईल." असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.


अश्विनी भावे यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. 'किती छान वाटते असे तुम्हाला पाहिल्यावर. म्हणजे जणु तुम्ही आमच्यातल्याच वाटतात. म्हणजे मिळून मिसळून कोणताही मनात गर्व न ठेवता अश्या साधेपण असणाऱ्या माझ्या अश्विनी मॅडम','किती गोड आहेस गं तु....अगदी आपली शी वाटतेस अशीच रहा आनंदी' असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे.

Web Title : अश्विनी भावे ने फार्म जीवन का आनंद लिया, सोशल मीडिया पर झलक साझा की।

Web Summary : अमेरिका में रहने वाली अभिनेत्री अश्विनी भावे ने भारत में अपने फार्म की यात्रा का एक वीडियो साझा किया। उन्होंने किसानों के साथ बातचीत करने, स्थानीय व्यंजनों का आनंद लेने और पृथ्वी दिवस पर बचपन की यादों को ताजा करने का आनंद लिया।

Web Title : Ashwini Bhave enjoys farm life, shares glimpse on social media.

Web Summary : Actress Ashwini Bhave, residing in America, shared a video of her farm visit in India. She enjoyed interacting with farmers, relishing local treats, and reminiscing childhood memories on Earth Day.