बॉलिवूड अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणारी अंकिता या उद्योगपतीला करतीये डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 17:21 IST2018-06-07T17:17:18+5:302018-06-07T17:21:56+5:30

अभिनेता सुशांत सिंह राजपूतपासून वेगळी झाल्यानंतर एकटी पडलेली अंकिता आता मुंबईतील एका उद्योगपतीला डेट करत असल्याची माहिती आहे. 

Ankita Lokhande dating mumbai based businessman | बॉलिवूड अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणारी अंकिता या उद्योगपतीला करतीये डेट

बॉलिवूड अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणारी अंकिता या उद्योगपतीला करतीये डेट

मुंबई : 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या लव्हलाईफमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतपासून वेगळी झाल्यानंतर एकटी पडलेली अंकिता आता मुंबईतील एका उद्योगपतीला डेट करत असल्याची माहिती आहे. 

विक्की जैन असं मुंबईतील या उद्योगपतीचं नाव असून काही महिन्यांपूर्वीच दोघे जवळ आल्याचे समजते. गेल्यावर्षी होळीच्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये दोघे एकत्र आले होते. आणि दोघांची जवळीकता पाहून दोघांमध्ये केवळ मैत्री नसून आणखीही काही असल्याचे दिसले होते. 

महत्वाची बाब म्हणजे दोघेही एकाच सोसायटीमध्ये राहतात आणि अनेकदा एकत्र वेळ घालवतानाही दिसले आहेत. विक्की हा बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे. 

अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिचा आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होती. पुढे 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. 

या दोघांचं ब्रेकअप होण्याची वेगवेगळी कारणे सांगितली गेली होती. पण मुख्य कारण कुणालाच कळू शकलं नाही. दोघांनी त्यांच्या ब्रेकअप काहीही अंदाज बांधू नये असे आवाहन केले होते. आता अंकिता पुन्हा आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.

Web Title: Ankita Lokhande dating mumbai based businessman