अमृता झळकणार वेबसीरिजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 03:30 IST2017-03-18T03:30:46+5:302017-03-18T03:30:46+5:30

वेबसीरिजचे सध्या चांगलेच फॅड आलेले आहे. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेतेदेखील वेबसीरिजकडे वळाले आहेत. त्याचसोबत मराठीतील अनेक कलाकारदेखील वेबसीरिजमध्ये झळकताना

Amrita will be seen in WebSeries | अमृता झळकणार वेबसीरिजमध्ये

अमृता झळकणार वेबसीरिजमध्ये

वेबसीरिजचे सध्या चांगलेच फॅड आलेले आहे. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेतेदेखील वेबसीरिजकडे वळाले आहेत. त्याचसोबत मराठीतील अनेक कलाकारदेखील वेबसीरिजमध्ये झळकताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. आता अमृता खानविलकर एका वेबसीरिजमध्ये झळकणार असून, ही वेबसीरिज सायको-थ्रिलर असणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती एकांत बबानी करणार आहेत. या वेबसीरिजचे नाव बाके आणि बुरी असे असून, त्याच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील झाली आहे. अमृताने मोठ्या पडद्यासोबत छोट्या पडद्यावरही काम केले आहे. पण, कोणत्याही वेबसीरिजमध्ये काम करण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या वेबसीरिजमध्ये काम करण्यासाठी ती सध्या खूप उत्सुक आहे. ती सांगते, ‘कोणत्याही वेबसीरिजमध्ये काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. या वेबसीरिजसाठी मी सध्या चित्रीकरण करत असून, माझा चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला आहे.’ या वेबसीरिजचे चित्रीकरण सध्या सुरू असून, अमृता यामध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ही वेबसीरिज काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Amrita will be seen in WebSeries