रुस्तममध्ये नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार

By Admin | Updated: February 25, 2016 09:46 IST2016-02-25T09:43:38+5:302016-02-25T09:46:56+5:30

टिनू देसाईच्या रुस्तम या रोमँटिक थ्रिलरमध्ये अक्षय कुमार रुस्तम पावरी या नेव्ही ऑफिसरची भूमिका करणार आहे.

Akshay Kumar will be seen in the role of Navy Officer in Rustom | रुस्तममध्ये नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार

रुस्तममध्ये नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार

>ऑनलाइन लोकमत
टिनू देसाईच्या रुस्तम या रोमँटिक थ्रिलरमध्ये अक्षय कुमार रुस्तम पावरी या नेव्ही ऑफिसरची भूमिका करणार आहे. पारसी समाजानं या देशाला दिलेल्या प्रचंड योगदानामुळे अक्षय पारसी लोकांचा फॅन असून पारसी अधिका-याची भूमिका साकारायला मिळत असल्यामुळे खूश आहे. 
शांतताप्रिय पारसी समाजातील व्यक्तिची भूमिका करायला मिळत असल्यामुळे मला आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली आहे. 
पारसी भारतातल्या लोकसंख्येच्या 0.1 टक्क्यांपेक्षा कमी आहेत, पण त्यांनी कधी अल्पसंख्याकांचा दर्जा मागितला नाही. त्यांना कुठल्याही अन्य समाजानं कधी धमक्या दिल्या नाहीत. अशा प्रकारची पोस्ट अक्षय कुमारच्या रुस्तम पावरीच्या इमेजसोबत फिरत आहे.
 
 
एअर लिफ्ट या सत्यकथेवर आधारीत सिनेमातल्या रणजीत कटयालची भूमिका गाजवल्यानंतर रुस्तम पावरी ही देखील सत्यकथेवर आधारीत भूमिका अक्षय यशस्वी करून दाखवेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात अक्षयकुमार सोबत इलियाना डिक्रूझ आणि ईशा गुप्ता या हिरॉइन्स असतील अशी चर्चा आहे.
हा सिनेमा 26 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Web Title: Akshay Kumar will be seen in the role of Navy Officer in Rustom