‘दृश्यम’च्या रिमेकमध्ये अजय की अक्षय?
By Admin | Updated: September 26, 2014 04:06 IST2014-09-26T04:06:28+5:302014-09-26T04:06:28+5:30
दक्षिण भारतीय प्रेक्षकांना मोहीत करणाऱ्या ‘दृश्यम’ या हिट मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक बनणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे

‘दृश्यम’च्या रिमेकमध्ये अजय की अक्षय?
दक्षिण भारतीय प्रेक्षकांना मोहीत करणाऱ्या ‘दृश्यम’ या हिट मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक बनणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. वायकॉम १८ने या चित्रपटाचे अधिकार खरेदी केल्याची चर्चा आहे.या चित्रपटात सुपरस्टार मोहन लाल यांनी मुख्य भूमिका केली होती. अक्षय कुमार आणि अजय देवगण दोघेही हा चित्रपट करण्यासाठी उत्सुक आहेत; त्यामुळे निर्माते आता दोघांपैकी कोणाची निवड करावी या विचारात आहेत. फीस आणि तारखांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर महिनाभरात अभिनेत्याची निवड केली जाणार आहे. सध्या तरी अक्षय आणि अजय या चित्रपटासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.