"तान्ह्याचं नमन राजे...!"; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाला अजय देवगणकडून मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 21:16 IST2026-04-18T21:15:55+5:302026-04-18T21:16:38+5:30

'राजा शिवाजी'चा टीझर पाहिल्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

Ajay Devgn praised and reaction after see first look of Riteish Deshmuk Raja Shivaji movie | "तान्ह्याचं नमन राजे...!"; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाला अजय देवगणकडून मानाचा मुजरा

"तान्ह्याचं नमन राजे...!"; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाला अजय देवगणकडून मानाचा मुजरा

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर समोर येताच प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातही या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली. टीझर पाहिल्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीतून व्यक्त केलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ मधून मराठ्यांच्या शौर्यगाथेला मोठ्या पडद्यावर साकारलेला अजय देवगण, आता ‘राजा शिवाजी’ची झलक पाहून पुन्हा एकदा शिवरायांना मानाचा मुजरा करताना दिसला. अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया स्टोरीवर चित्रपटाचा एक खास फोटो शेअर करत लिहिलंय की, “तान्ह्याचं नमन राजे, हे खूप अद्भूत दिसतंय” असं म्हणत अजयने चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक केले. यासोबतच “शुभेच्छांची गरज नाही, पण राजा शिवाजीच्या शौर्यगाथेला सलाम! जय शिवराय”, अशा शब्दांत अजयने रितेश विलासराव देशमुख आणि चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

अजय देवगणच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.  ‘तान्हाजीकडून शिवरायांना दिलेला मानाचा मुजरा’ असं म्हणत नेटकरी कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी ‘छावा’ चित्रपटातून संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने सुद्धा “आबासाहेब” अशी कमेंट करत शिवरायांना आदरांजली वाहिली होती.

सोशल मीडियावर या पोस्ट्सना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून, नेटकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून मिळणारा हा पाठिंबा पाहता, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस आता अधिकच शिगेला पोहोचली आहे. जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title : अजय देवगन ने रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' टीज़र को सराहा।

Web Summary : अजय देवगन ने रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' के टीज़र की भव्यता की सराहना की। उन्होंने टीम को शुभकामनाएं दीं, शिवाजी महाराज की वीरता की झलक की प्रशंसा की। फिल्म 1 मई, 2026 को रिलीज होगी।

Web Title : Ajay Devgn salutes Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' teaser.

Web Summary : Ajay Devgn praised Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' teaser, hailing its grandeur. He wished the team success, admiring the glimpse of Shivaji Maharaj's bravery. The film releases May 1, 2026.