७ वर्षाच्या गुटर-गूं नंतर अमृता राव-अनमोलचे "शुभमंगल सावधान"

By Admin | Updated: May 15, 2016 18:17 IST2016-05-15T18:17:56+5:302016-05-15T18:17:56+5:30

बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेली अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल हे आज विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या ७ वर्षापासून त्यांच्यात गुटर-गूं सुरु होत.

After seven-year-old gutter, Amrita Rao-Anmol's "Shubhamangal careful" | ७ वर्षाच्या गुटर-गूं नंतर अमृता राव-अनमोलचे "शुभमंगल सावधान"

७ वर्षाच्या गुटर-गूं नंतर अमृता राव-अनमोलचे "शुभमंगल सावधान"

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ : बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेली अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल हे आज विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या ७ वर्षापासून त्यांच्यात गुटर-गूं सुरु होत. पण अमृताने हे अफेअर कधीच कोणाला कळू दिले नाही. अनमोल हा रेडिओ जॉकी असून इश्क-विश्क' सिनेमातून पदार्पण करणा-या अमृताला रुपेरी पड्यावर 'सत्याग्रह' सिनेमा शेवटचे पाहिले होते सध्या मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत दिसून येत आहे. या विवाहसोहळ्याला दोन्ही पक्षाकडील परिवार आणि खास मित्रमैत्रीणी उपस्थिती लावली होती.

अनमोलने प्रथमच एक फोटो त्याच्या फेसबुकच्या टाईमलाईनवर शेअर केला आहे. यात अनमोलने त्याची प्रेमकहाणी सांगितली आहे की कशी एका मुलाखतीदरम्यानल झालेली भेट प्रेमात बदलली आणि अमृता त्याची जीवनसंगिनी झाली. अनमोलने भावी आयुष्यासाठी सर्वाच्या शुभेच्छा मागितल्या आहेत.

Web Title: After seven-year-old gutter, Amrita Rao-Anmol's "Shubhamangal careful"